टाटांच्या कारखान्याला भीषण आग! Apple चीनच्या वाटेवर? ₹20920000000 चं कनेक्शन


Big Blow To Tata From Apple:  तामिळनाडूमधील होसूर येथील टाटा समुहाच्या कारखान्याला आग लागल्याने मोठं नुकसान झालं आहे. ज्या कारखान्याला आग लागली त्या कारखान्यामध्ये अ‍ॅपल आयफोनचे सुटे भाग तयार केले जातात. ही आग लागल्याने येथे तयार होणाऱ्या आयफोनच्या सुट्या भागांच्या निर्मिती परिणाम होणार आहे. भारतामध्ये सणासुदीला आयफोनची मागणी वाढत असतानाच आग लागल्याने झालेल्या नुकसानीमुळे गरजेनुसार पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच आता जगातील अग्रगण्य स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेली अ‍ॅपलकडून मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी हे महत्त्वाचे सुटे भाग चीन किंवा इतर देशांमधून मागवू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासंदर्भातील माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. 

भारतातील असा एकमेव कारखाना जिथे

टाटांच्या कारखान्याला लागलेल्या आगीमुळे तामिळनाडूमधील होसूर येथील कारखान्यातील निर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे. आयफोन निर्मितीमध्ये फोनचे बॅक पॅनल आणि इतर काही महत्त्वाचे सुटे भाग पुरवठा करणारा हा एकमेव कारखाना आहे. अ‍ॅपलचं कंत्राट घेतलेल्या फॉक्सकॉनसाठी आणि आयफोनच्या असेम्बली प्लॅण्टसाठी या कारखान्यामध्ये सुटे भाग तयार केले जातात. हाँगकाँगमधील काऊण्टर पॉइण्ट रिसर्च कंपनीने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सणासुदीच्या काळात भारतामध्ये आयफोन 14 आणि 15 च्या 15 लाख फोन्सची मागणी असेल असा अंदाज आहे. पण या कारखान्याला आग लागल्याने ही मागणी भरुन काढताना अ‍ॅपलला 15 टक्क्यांची तूट भरुन काढण्याची कसरत करावी लागेल अशी शक्यता आहे.

परदेशातून फोन आणून विकणार?

“भारतात निर्मिती होणाऱ्या आयफोनच्या जुन्या मॉडल्सच्या निर्मितीवर 10 ते 15 टक्के परिणाम होईल. अ‍ॅपल कंपनी ही तूट भरुन काढण्यासाठी परदेशातून सुटे भाग आयात करेल. तसेच भारतात परदेशातून आणलेले फोन विक्रीचा पर्यायही कंपनी निवडू शकते,” असं निल शाह यांनी म्हटलं आहे. निल हे काऊण्टर पॉइण्टचे सहसंस्थापक आहेत. ही कंपनी मागील काही वर्षांपासून अ‍ॅपल कंपनीच्या जगभरातील आयात निर्यातीवर लक्ष ठेऊन आहे.

2092 कोटींची निर्यात

स्थानिक विक्रीबरोबरच टाटा कंपनी स्वत: नेदरलॅण्ड्स आणि अमेरिकेमध्ये आयफोनची निर्यात करते. चीनमध्येही टाटाकडून काही सुटे भाग निर्यात केले जातात. भारतातून टाटाने 2092 कोटी 91 लाख 37 हजार 500 रुपयांचा माल वर्षभरापासून 31 ऑगस्टपर्यंत निर्यात केलेला आहे. 

चीनची मदत घेणार

अ‍ॅपलच्या सप्लायर्सकडे सामान्यपणे तीन ते चार आठवडे पुरेल इतका बॅक पॅनलचा साठा आहे, असं काऊण्टरपॉइण्टने सांगितलं आहे. मात्र या क्षेत्रातील जाणाकारांनुसार अ‍ॅपल सामान्यपणे आठ आठवड्यांचा साठा करुन ठेवते. त्यामुळेच त्यांच्यावर लगेच थेट परिणाम होणार नाही. मात्र दिर्घकाळ तामिळनाडूमधील टाटाच्या कारखान्यातील सुट्या भागांची निर्मिती बंद राहणार असेल तर अ‍ॅपल कंपनी चीन किंवा इतर देशांमधून सुटे भाग आणून भारतामध्ये आयफोन निर्मिती सुरु ठेवले असं सांगितलं जात आहे. 

आग लागलेल्या कारखान्यात 20 हजार लोक करतात काम

या पुरवठासंदर्भातील तुटवड्यामुळे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या आयफोनच्या सुट्या भागांच्या निर्मितीवर परिणाम झाला आहे. ज्या कारखान्याला आग लागली आहे तिथे 20 हजार कर्मचारी काम करता. टाटाच्या याच कॉम्प्लेक्समधील अन्य एका कारखान्यामध्ये या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आयफोनच्या सुट्या भागांच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे. मात्र आता लागलेल्या आगीमुळे हा कालावधीही पुढे जाणार का याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24