बच्चेकंपनीसाठी बर्थडे गिफ्ट ठरलं तर! Hero नं लाँच केलीय जबरदस्त ई-बाइक; टॉप स्पीडही पाहून घ्या…


Auto News Hero MotoCorp : कधीकधी लहान मुलं सायकलच हवीये, त्यातही त्याचे काहीतरी नवे प्रकार हवेत असा हट्ट धरतात आणि पालकांची पंचाईत होते. त्यातही हा इतका खर्च इतक्याशा सायकलसाठी? असंही अनेकदा म्हटलं जातं. पण, मुलांना सायकल, बाईक यांचं वेड असेल आणि तुम्ही त्यांना काहीतरी खास भेट करु इच्छिता तर बाईक विश्वात कमाल मॉडेल लाँच करणाऱ्या Hero MotoCorp नं त्यांच्या विदा (VIDA) ब्रँडचं नवं मॉडेल, नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही बाईक फक्त लहान मुलांसाठीच सुरु करण्यात आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

लहान मुलांसाठी खास बाईक… सगळी माहिती पाहूनच घ्या..

वयवर्ष 4 ते 10 या वयोगटातील मुलांसाठी ही बाईक लाँच करण्यात आली असून, प्राथमिक स्वरुपात ही एक इलेक्ट्रिक मोटरसायकल (Electric Motorcycle) आहे. विदा या कंपनीकडून बाईकप्रेमी मुलांसाठी लाँच करण्यात आलेल्या या मॉडेलचं नाव आहे DIRT.E K3. एक ऑफरोड लाईन प्रोडक्ट असणारी ही बाईक तिच्या कमाल आकारामुळं चर्चेत आहे. ‘Wild beyond the Ride’ अशी या बाईकची टॅगलाईन आहे. 

काय आहेत या बाईकची वैशिष्ट्य? 

बाईकमध्ये थ्री-स्टेज एडजस्टेबल सिस्टम असून त्यामुळं मोटरसायकलला Small, Medium, Large कॉन्फिगरेशनमध्ये बदलता येतं. वर्षानुवर्षांपर्यंत रायडिंग एर्गोनॉमिक्ससोबत मुलांना बाईक रायडिंगचाही यामुळं अनुभव मिळते. DIRT.E K3 दीर्घ काळासाठी मोटरसायकलिंग फाऊंडेशन तयार करण्यात मदत करते. Parents App Eabled कंट्रोलसह या बाईकला कस्टमाईजही करता येतं. या अॅपमध्ये स्पीड लिमीट सेट करण्याची सुविधा असून, त्यामुळं मुलांना सुरक्षित रायडिंगचा अनुभव मिळतो. शिवाय अॅपमधून रिअल टाईम ओवरसाईटही मइळते. ज्यामुळं मुलांवर लक्षही ठेवता येतं. 

बाईकचे इतर फीचर… 

  • 500W पीक मोटर
  • 360Wh रिमूवेबल बॅटरी
  • 3 तासात 0-100% चार्ज
  • बॅटरीसाठी मॅग्नेटिक कनेक्टर
  • 3 राइडिंग मोड्स- Beginner, Amateur, Pro—support
  • 8 km/h, 16 km/h, 25 km/h की स्पीड
  • 16 टायर
  • सिंगल रियर हाइड्रोलिक डिस्क ब्रेक

कंपनी ही बाईक 3 रंगांमध्ये सादर करत असून, यामध्ये लाल, जांभळा आणि पांढरा अशा रंगांचा समावेश आहे. या बाईकची प्रारंभी किंमत 69990 रुपये इतकी असून, प्राथमिक स्वरुपात ती सुरुवातीच्याच 300 युनिटसाठी लागू आहे. 15 जानेवारी 2026 पासून या बाईकची डिलीव्हरी सुरू होणार असून, सुरुवातीला ती पुणे, दिल्ली, बंगळुरू, जयपूर इथं उपलब्ध असेल. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *