2025 मध्ये गुगलवर का Viral झाले, Pookie, Nonce आणि Incel हे शब्द? त्यांचा नेमका अर्थ काय?


Google Year Ender Trending Slang of 2025 : गुगलकडून दरवर्षी अखेरच्या महिन्यामध्ये वर्षभरात गुगलच्या या विश्वात नेटकऱ्यांनी नेमकी काय उलथापालथ केली, कोणत्या गोष्टींबाबतची माहिती शोधली, विविध क्षेत्रांमध्ये कोणाची नावं पुढे राहिली या आणि अशा धर्तीवरील एक सारासार यादी प्रसिद्ध करण्यात येते. यंदाच्या वर्षासाठीच्या विविध याद्या गुगलनं प्रसिद्ध केल्या असून अगदी सर्वाधिक ‘सर्च’ करण्यात आलेल्या रेसिपीपासून, सेलिब्रिटी आणि सर्वाधिक वापरण्यात आलेल्या शब्दाचासुद्धा उलगडा करण्यात आला. 

Add Zee News as a Preferred Source

गुगलवर असे शब्द सातत्यानं वापरण्यात आले, ज्यांचा अर्थ अनेकांनाच ठाऊक नाही…

2025 मध्ये गुगलवर सर्वाधिक चर्चेत ठरलेले ‘स्लँग’ म्हणजे Pookie, Nonce आणि Incel. सुरुवातीला या शब्दांचा वापर सोशल मीडियावर अधिकाधिक प्रमाणात करण्यात आला होता. मात्र दिवस पुढे जात राहिले आणि या शब्दांचा वापर थेट सामान्यांच्या जीवनातही होऊ लागला. पण, त्याचा अर्थ मात्र अनेकांना ठाऊकच नाही. त्यामुळं या शब्दांचा अर्थ जाणून घ्याच…. 

पूकी (Pookie)
सोशल मीडियावर यंदा सर्वाधिक व्हायरल झालेला शब्द म्हणजे, पूकी. या शब्दाचा अर्थ आहे ‘गोड, प्रिय…’. कोणा एका आपल्या जवळच्या आणि प्रेमाच्या व्यक्तींना ‘पूकी’ म्हणून संबोधलं जातं. एखाद्या Cute गोष्टीलाही पूकी असं म्हणतात. इतकंच नव्हे तर, जोडपी, विविध ब्रँडसुद्धा हा ट्रेंड फॉलो करताना दिसले असून, काहींना या शब्दाच्या अर्थाची कल्पना नाही. ही मंडळी गुगलला याचा अर्थ विचारत असताना त्यांना मिळणारं उत्तर आहे, ‘एक अशी व्यक्ती जी तुमच्या मनाच्या अतिशय. जवळची असते’. हा शब्द प्रेमाची व्यक्ती, पाळीव प्राणी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी वापरला जातो. 

इंसेल (Incel) 
‘इंसेल’, या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठीसुद्धा नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. हा शब्द अशा मंडळींसाठी उपस्थित केला जातो, ज्यांना महिलांना आकर्षित करता येत नाही. याचमुळं अनेकदा महिलांविरोधात वाईट भावनाही बाळगली जाते. इंटरनेटवर या अर्थाचा वापक महिलांप्रती चुकीच्या भावना व्य.र्क करणाऱ्या एका समुहाला अधोरेखित करम्यासाठी केला जातो 

नॉन्स (Nonce) 
यंदा नॉन्स शब्दाचीही इंटरनेवर चलती पाहायला मिळाली. या शब्दाच्या वापरामागचं मुख्य कारण ठरलं ते म्हणजे त्याचं क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉईनसारख्या तांत्रिक बाबींशी असणारं नातं. ऑनलाईन चर्चा आणि लेखांमध्ये याचा वापर केला जातो. नॉन्स म्हणजे एखादी अश वस्तू, आकडेवारी किंवा मोजणी जी एकदाच विचारात येते. कंप्यूटिंगमध्ये , विशेषत: ऑनलाईन संवादामध्ये या शब्दाचा अधिक वापर होतो. ही एक अद्वीतीय आणि एकदाच वापरली जाईल अशी आकडेवारी आहे. ज्यामध्ये अनेकदा वेळएचीही माहिती असते. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *