Grand Vitara चा बोल्ड लूक; मारुती सुझुकीनं पहिल्यांदाच ‘या’ रंगात आणली जबरदस्त कार


Auto News : ऑटो क्षेत्रामध्ये बहुतांशी कार उत्पादन कंपन्या सध्या ईव्हीकडे वळत असतानाच देशातील अनेकांच्याच प्राधान्यस्थानी असणाऱ्या मारुती सुझुकीनं एक अनपेक्षित निर्णय घेत कारप्रेमींचं लक्ष वेधलं आहे. सध्या कंपनीकडूव व्हीकल पोर्टफोलिओमध्ये बरेच बदल केले जात असून, नुकतीच कंपनीनं ग्रँड विटारा कारचं नवं एडिशन लाँच केलं आहे.

maruti suzuki Grand Vitara Phantom Blaq ही कार स्ट्राँग हायब्रिड अल्फा+ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कंपनीकडून लाँच करण्यात आलेली ही कार मॉडल मॅट कलरमध्ये उपलब्ध असून कंपनीकडून हा रंग अद्यापही कोणत्याही इतर कारसाठी वारण्यात आला नव्हता. त्यामुळं हा रंग अनेकांसाठीच लक्षवेधी ठरत असून कारची जमेची बाजू ठरत आहे.

नेक्साच्या डिलरशिपला एक दशक पूर्ण झाल्यानंतर मारुती सुझुकी इंडिटा लिमिटेडकडून ग्रँड विटारा फँटम ब्लॅक एडिशन सादर केलं आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार ही कार अशा मंडळींसाठी लाँच करण्यात आली आहे, ज्यांना प्रिमियम फिचरसह एखादी खिशाला परवडणारी कार हवी आहे.

कारच्या फिचर्सची यादी संपता संपेना…

फँटम कारच्या ‘ब्लॅक’ एडिशनमध्ये मॅट ब्लॅक फिनिश आणि डी क्रोम्ड लूक देण्यात आला आहे. याशिवाय कारला ब्लॅक आऊट फ्रंट ग्रिल आणि काळ्या रंगाची फिनिश असणारे 17 इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. हे कारला प्रचंड प्रिमियम फील देतात. कारच्या इंटेरिअरमध्येसुद्धा सर्व गोष्टी काळ्या रंगातील असून अनेकांसाठीच हे फिचर लक्ष वेधत आहे.

कारमध्ये पॅनोरॅमिक सनरुफ, वेंटिलेटेड फ्रंट सीट, वायरलेस अँड्रॉईड ऑटो, APPLE कार प्ले यासोबतच 9 इंचांची इन्फोटेन्मेंट सिस्टीम, 360 डिग्री कॅमेरा, हेड्स अप डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, कनेक्टेड कार फंक्शन अशाही सुविधा, फिचर देण्यात आले आहेत. तर सेफ्टी फिचरच्या बाबतीत कारमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) सोबत Anti Lock ब्रेकिंग सिस्टम (ABS), हिल होल्ड कंट्रोल, रिवर्स पार्किंग सेंसर, 3 पॉईंट सीटबेल्ट असे फिचर देण्यात आले आहेत.

कारचा रंग नवा असला तरीही तिच्या मॅकेनिकल गोष्टींमध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. इंजिन क्षमतेबाबत सांगावं तर ही कार एटकिंसन सायकल पेट्रोल इंजिनसह चालकाला एक कमाल अनुभव देऊन जाते. जिथं 1.5 लीटर क्षमतेचं 3 सिलेंडर इंजिन 91 बीएचपी पॉवर जनरेट करतं. त्यामुळं एका विश्वासार्ह ब्रँडची कार घ्यायचा विचार तुम्ही करत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे, असं म्हणायला हरकत नाही.

FAQ

या कारच्या इंटेरिअरमध्ये काय वैशिष्ट्ये आहेत?
इंटेरिअर पूर्णपणे काळ्या रंगात आहे, जे अनेकांसाठी आकर्षणाचे ठरते. यामध्ये पॅनोरॅमिक सनरुफ, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 9 इंचांची इन्फोटेन्मेंट सिस्टीम, 360 डिग्री कॅमेरा, हेड्स अप डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग आणि कनेक्टेड कार फंक्शन्स सारख्या सुविधा आहेत.

या कारमध्ये कोणते सेफ्टी फिचर्स आहेत?
सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), हिल होल्ड कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग सेंसर आणि 3 पॉईंट सीटबेल्ट यासारखी फिचर्स देण्यात आली आहेत.

या कारचा इंजिन कोणत्या प्रकारचा आहे?
फँटम ब्लॅक एडिशनमध्ये 1.5 लीटर, 3 सिलेंडर एटकिंसन सायकल पेट्रोल इंजिन आहे, जे 91 बीएचपी पॉवर जनरेट करते. यामध्ये मॅकेनिकल बदल फारसे नाहीत, परंतु हे विश्वासार्ह कामगिरी देते.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24