Samsung Galaxy s24 Ultra : स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लानिंग करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम संधी आहे. सध्या सॅमसंग गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा (Samsung Galaxy s24 Ultra) फोन अगदी स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्टचा सेल सुरु आहे. या सेलमध्ये हा फोन मोठ्या सवलतींसह खरेदी करता येतो. या फ्लॅगशिप फोनची मूळ किंमत आता 80,000 रुपयांपेक्षा कमी झाली आहे. तर जेव्हा तो बाजारात लाँच झाला तेव्हा त्याची किंमत 1,30,000 रुपये ठेवण्यात आली होती, म्हणजेच तुम्ही सुमारे 50,000 रुपयांची बचत होणार आहे.
Samsung Galaxy s24 Ultra हा फोन भारतात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला. या फोनची स्टार्टिंग किंमत 1,29,999 रुपये इतकी होती. परंतु सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये या फोनवर सुमारे 50,000 रुपयांची सूट मिळत आहे. अमेझॉनवर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 80,490 रुपये आहे, तर हाच व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 81,980 रुपयांना खरेदी करता येईल. तथापि, फ्लिपकार्टवर, फ्लिपकार्ट अॅक्सिस क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 4,000 रुपयांची अतिरिक्त त्वरित सूट उपलब्ध आहे, ज्यामुळे या फोनची वास्तविक किंमत 80,000 रुपयांपेक्षा कमी होते.
Samsung Galaxy s24 Ultra फोनचे बेस्ट फिचर्स
Galaxy S24 Ultra च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.8-इंचाचा क्वाड HD+ डायनॅमिक AMOLED डिस्प्ले आहे. यात 2,600 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. या फोनमध्ये गोरिल्ला ग्लास आर्मर प्रोटेक्शन आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर, 200MP शक्तिशाली कॅमेरा देण्यात आला आहे. यात टायटॅनियमची बॉडी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅमसंग या फोनला 6 वर्षांसाठी सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट देईल, जेणेकरून तो बराच काळ नवीन आणि सुरक्षित राहील. जर तुम्ही विश्वासार्ह आणि शक्तिशाली स्मार्टफोन शोधत असाल तर ही डील तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हा फोन सध्या One UI 7 वर चालत आहे, जो Android 15 वर आधारित आहे, परंतु Samsung ने घोषणा केली आहे की लवकरच या स्मार्टफोनसाठी Android 16 वर आधारित One UI 8 देखील आणले जाईल.
या दोन अपग्रेड्स व्यतिरिक्त, S24 अल्ट्रामध्ये 5 वर्षांचे OS अपडेट्स मिळतील. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये चार कॅमेरे आहेत. यात 200MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यामध्ये OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) आहे. यासोबतच, 12MP चा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 3x झूमसह 10MP चा टेलिफोटो लेन्स आणि 5x झूम क्षमतेसह 50MP चा पेरिस्कोप लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 12MP चा कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि Qi वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यात IP68 रेटिंग आहे, जे पाणी आणि धूळांपासून संरक्षण देते. हा फोन 1.5 मीटर पाण्यात 30 मिनिटांपर्यंत काम करु शकतो.