Toyota ची लक्झरी कार भारतात लाँच; Inside Photo पाहूनच कारप्रेमी म्हणतात, हा तर रणगाडा…


Toyota Land Cruiser LC300 GR Sport: कारप्रेमींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या ब्रँडमध्ये टोयोटाचंसुद्धा नाव येतं. कमाल इंजिन आणि कारची ड्युरेबलिटी यामुळं कैक वर्षांपारसून कारप्रेमींनी या कंपनीला पसंती दिली आहे. बऱ्याच नेत्यांपासून ते सेलिब्रिटी आणि थेट अमेरिकेतील काही बड्या संस्थांकडून टोयोटाला पसंती दिली जात असतानाच या कंपनीचं एक कमाल मॉडेल भारतातही लाँच झालं आहे. 

टोयोटाच्या कोणच्या कार मॉडेलची हवा? 

Toyota Land Cruiser LC300 GR Sport ही कार भारतात लाँच झाली असून, ही फक्त एक कार नव्हे, तर कार जाणकारांच्या मते रस्त्यावर चालणारा हा एक रणगाडाच आहे असंच ऑटो क्षेत्रातील जाणकारांचं मत. भारतातील एकदम सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यांसमवेत ओबडधोबड रस्त्यांवरही ही कार उत्तम कामगिरी करते असा दावा कंपनी करत आहे. 

कारचं डिझाईन आणि रोड प्रेझेन्स कसा आहे? 

कारच्या या मॉडेलमध्ये GR-S अर्थात रेसिंग वर्जन पाहायला मिळत आहे. यामध्ये ब्लॅक अलॉय व्हील्स, स्पेशल GR-S बॅजिंग, ड्यूल टोन कलर आणि विविध बंपर देण्यात आले आहेत ज्यामुळं ही कार अनेकांच्याच पसंतीस उडत आहे. या एसयुव्ही कारची लांबी जवळपास 5 मीटर असल्यामुळं ही कार रस्त्यावर चांगलीच उठून दिसते यात वाद नाही. 

कसं आहे कारचं इंटेरिअर आणि परफॉर्मन्स? 

कारमध्ये देण्यात आलेलं LC300 डिझाईन रिफाईंड आणि लक्झरी अनुभव गेत असून, यामध्ये अनेक हाय एंड गॅजेटसुद्धा देण्यात आले असून त्याची बिल्ट क्वालिटी कंपनीच्या उत्तम दर्जाची जाणीव पहिल्याच नजरेत करून देते. टोयोटाच्या या कारमध्ये तुलनेनं हलकं स्टिअरिंग व्हील देण्यात आलं आहे.

कारच्या इंजिनाविषयी सांगावं तर, त्यात  3.3-लीटर V6 ट्विन-टर्बो डिझेल इंजिन देण्यात आलं असून, त्यातून 309 hp आणि 700 Nm  टॉर्क जनरेट होतं. टोयोटाच्या कारला 10-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिशत असल्यानं कार चालवताना त्यामुळं आरामदायक अनुभव मिळत असल्याचा दावा कंपनी करते. 

कारची किंमतही तितकीच मोठी…. 

टोयोटाची ही लक्झरी कार आणि तिचे अफलातून फिचर्स पाहता ही कार 2.40 कोटी रुपये एक्स शोरून इतक्या किमतीमध्ये उपलब्ध असून, या कारसाठी सुरुवातीपासूनच वेटिंग असल्यानं ती लगेचच उपलब्ध होणार नाहीये. कोट्यवधींची ही कार अनेकांच्याच खिशाला परवडणारी नसली तरीसुद्धा श्रीमंत वर्ग मात्र नक्कीच या कारला पसंती देताना दिसेल यात वाद नाही. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24