भारतीय ग्राहकांचा दृष्टिकोन झपाट्याने बदलतो आहे. पारंपरिक उपकरणांऐवजी आता स्मार्ट, इनोव्हेटिव्ह आणि बहुपर्यायी गृहउपकरणांची मागणी झपाट्याने वाढते आहे. यामध्ये विशेष लक्ष वेधून घेत आहे ते मोठ्या आकाराचे AI-पॉवर्ड रेफ्रिजरेटर्स! जे आता केवळ ‘फ्रीज’ नसून स्मार्ट किचनचा अविभाज्य भाग बनले आहेत. गोदरेज अप्लायन्सेस बिझनेसचे रेफ्रिजरेटर विभाग प्रमुख अनुप भार्गव सांगतात, “ग्राहक केवळ उत्पादन शोधत नाही, तर संपूर्ण अनुभव शोधतो आहे आणि AI रेफ्रिजरेटर्स हीच गरज पूर्ण करत आहेत.”
तुमच्या सवयी ओळखणारा स्मार्ट साथीदार
हे तुमच्या फ्रिज वापराच्या सवयी, अन्नाच्या प्रकारांनुसार आणि दरवाजा उघडण्याच्या वारंवारतेनुसार स्वतःहून कुलिंग अॅडजस्ट करतात. यामुळे अन्न अधिक काळ ताजं राहतं आणि वीजेचीही बचत होते.
प्रत्येक क्षणासाठी योग्य मोड
तुम्ही घरात असाल, बाहेर गेल्यावर फ्रीज वापर कमी असेल, किंवा तुम्हाला पटकन एखादा पदार्थ थंड करायचा असेल हे सर्व लक्षात घेऊन हे फ्रिज इंटेलिजंट मोड्स वापरतात.
- इको मोड – रोजच्या वापरात उर्जा बचत
- हॉलिडे मोड – बाहेर असताना उर्जा वापर कमी
- सुपर फ्रीझ मोड – ताज्या वस्तूंना झटपट थंडी देणं
तुमच्या गरजेनुसार बदलेलं स्टोरेज
हे रेफ्रिजरेटर्स एका झोनचा उपयोग फ्रीझर, चिलर किंवा पार्टी सेक्शन म्हणून करता येईल असा पर्याय देतात. उदाहरणार्थ, गोदरेज इयॉन वेलवेट मध्ये -3°C ते 5°C पर्यंत तापमान सेट करता येतं. त्यामुळे डेझर्ट, डेअरी, ड्राय फ्रूट्स यांचं साठवण अधिक लवचिक होतं.
मोठी जागा, अधिक सुव्यवस्था
600 लिटर किंवा त्याहून अधिक क्षमतेमुळे हे रेफ्रिजरेटर्स मोठ्या कुटुंबांसाठी आदर्श आहेत. प्रत्येक विभाग स्मार्टपणे डिझाइन केलेला असल्याने अन्न, उरलेले पदार्थ, स्नॅक्स आणि पेये व्यवस्थित मांडता येतात.
शक्तिशाली आणि शांत कामगिरी
नवीन युगातील इन्व्हर्टर कॉम्प्रेसर तापमानात आणि वीज पुरवठ्यात झालेला बदल ओळखून आपली कामगिरी आपोआप समायोजित करतो. यामुळे हे फ्रीज कमीत कमी आवाजात कार्यक्षमतेने चालतात. जे ओपन किचन असलेल्या घरांसाठी योग्य ठरतात.
स्मार्ट टच कंट्रोल्स आणि स्टायलिश लुक
डिजिटल टच पॅनलमुळे याचे नियंत्रण अतिशय सुलभ झाले असून, विविध मोड्स सहजपणे वापरता येतात. हे रेफ्रिजरेटर्स केवळ तांत्रिकदृष्ट्या स्मार्ट नाहीत, तर सजावटीच्या दृष्टीनेही उठावदार आहेत. उदाहरणार्थ, नवीन ऑपेरा पिंक ड्युएल टोन मध्ये येणारा ‘इयॉन वेलवेट साइड-बाय-साइड’ रेफ्रिजरेटर, जो कोणत्याही मॉडर्न किचनला उठावदार लुक देतो.
स्मार्टनेस, कार्यक्षमता आणि सौंदर्य यांचा परिपूर्ण मेळ
मोठ्या क्षमतेचे हे AI-पॉवर्ड रेफ्रिजरेटर्स केवळ आधुनिक यंत्रणा नसून, तुमच्या जीवनशैलीचा एक स्मार्ट विस्तार आहेत. इंटेलिजंट कुलिंग, अडॅप्टिव्ह स्टोरेज, ऊर्जा कार्यक्षमता आणि आधुनिक डिझाइन, या सर्व वैशिष्ट्यांनी हे प्रोडक्ट्स आजच्या कुटुंबांसाठी योग्य निवड ठरत आहेत.