Maruti Electric Car : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये ग्राहकांची विश्वासार्हता जिंकणाऱ्या ब्रँडमध्ये मारुती या ब्रँडचाही समावेश असून, या कारची बाजारातही प्रचंड मागणी पाहायला मिळते. अशी ही मारुती कंपनी गेल्या काही काळापासून कंपनीच्या इलेक्ट्रीक कारमुळं चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता कंपनीच्या या नव्या धाटणीच्या कारच्या लाँचसाठीचा मुहूर्त सापडल्यानं कार प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
कंपनीकडून नुकतंच e-Vitara लाँच होण्यासाठीची तारीख जाहीर करण्यात आली असून, 3 सप्टेंबर रोजी ही कार लाँच होईल असं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी Maruti e-Vitara ला ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये सादर करण्यात आलं होतं. या कारचं मॉडेल 10 रंगांमध्ये उपलब्ध राहणार असून त्यामध्ये 6 मोनो-टोन आणि 4 डुअल-टोन रंगांचा समावेश असेल. मोनो टोन रंगांच्य पर्यायामध्ये Nexa Blue, Splendid Silver, Arctic White, Grandeur Grey, Bluish Black आणि Opulent Red अशा रंगांचा समावेश आहे.
कारच्या फिचर आणि सेफ्टी फिचरची यादी संपता संपेना
मारुतीकडून या कारला म्हणजेच ई-विटाराला प्रिमीयम लूक देण्यासाठी LED हेडलाइट्स, DRLs आणि टेललॅम्प असे फिचर देण्यात आले आहेत. SUV मध्ये 18 इंच व्हील्स, अॅक्टीव्ह एअर वेंट ग्रिल देण्यात आले असून त्यामुळं कारची एयरोडायनामिक क्षमता वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे.
कारमध्ये मारुती ई विटारा पॅनोरामिक सनरुफ, मल्टी कलर एम्बिएंट लाइटिंग आणि इतर डिजिटल फिचरही देण्यात आले आहेत. या कारमध्ये 10.25-इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 10.1-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम असेही फिचर देण्यात आले आहेत. ही संपूर्ण प्रणाली वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करते.
सेफ्टी फिचर्स पाहूनच घ्या…
सुरक्षिततेच्या निकषांच्या बाबतीतसुद्धा 2 ADAS तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली कारमध्ये देण्यात आली असून, यामध्ये लेन कीप असिस्ट आणि अडेप्टिव क्रूज कंट्रोल असेही अॅडव्हान्स फिचर देण्यात आले आहेत. SUV मध्ये 7 एअरबॅग असून त्या माध्यमातून चालकासह कारनं प्रवास करणाऱ्यांच्याही सुरक्षिततेची निश्चिती करण्यात आली आहे.
कारच्या उर्वरित फिचर्समध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेंसरचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार कंपनीकडून ही कार 17 ते 18 लाख रुपये इतक्या दरात लाँच केली जाऊ शकते. मात्र कारच्या टॉप स्पेक व्हेरिएंटची किंमत 25 लाखांपर्यंत जाऊ शकते असंही म्हटलं जात आहे.