Royal Enfield पेक्षाही कमी किंमत; त्याच तोडीची ब्रँडेड बाईक, फिचर्स- लूक पाहून प्रेमात पडाल


Auto News: भारतातील रस्ते आणि भारतीयांची वाहन चालवण्याची एकंदर शैली पाहता अनेकांची कायमस्वरुपी पसंती मिळवणारा एक बाईक ब्रँड ठरला तो म्हणजे, (Royal Enfield) रॉयल एनफिल्ड. पण, याच ब्रँडला टक्कर देणारा आणखी एक ब्रँड मागील काही वर्षांमध्ये भारतीय तरुणाई आणि बाईक प्रेमींमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे.  

लूकपासून ते अगदी किंमत आणि फिचर्सपर्यंत हा ब्रँड काही अंशी एनफिल्डच्या जवळपास असल्यानं किमतीच्या शर्यतीत मात्र एनफिल्डवरही मात करताना दिसत आहे. हा ब्रँड म्हणजे ट्रायम्फ मोटरसायकल इंडिया. ट्रायम्फनं नुकतंच बहुप्रतिक्षित अशा Scrambler 400 XC बाईकला भारतात लाँच केलं असून त्याची सुरुवातीचीच किंमत 2.94 लाख इतकी निश्चित केली आहे. Scrambler 400 X पेक्षा ही किंमत 27000 रुपयांनी जास्त आहे.

असं असलं तरीही या जास्तीच्या रकमेत कंपनीनं ट्यूबलेस स्पोक व्हील्स आणि काही अद्ययावत तंत्र असणारी उपकरणंही बाईकशी जोडली आहेत, ज्यामुळं बाईकचं हे मॉड्युल खास ठरत आहे. कंपनीकडून इंडिविज्युअल स्पोक व्हील्सचाही खुलासा करण्यात आला असून ते एनफिल्डच्या तुलनेत खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत असं म्हटलं जात आहे.

ट्यूबलेस स्पोक व्हील्सची नेमकी किंमत काय?

  • ट्रायम्फ मोटरसायकलनं Scrambler 400 XC बाईकच्या स्पोक व्हील्सची किंमत समोर आणली असून कंपनीच्या माहितीनुसार हे व्हील्स भारतात आयात केले जातात.
  • या व्हील्सची निर्मिती तेच  OEM (Original Equipment Manufacturer)  करतात जे आधीपासून Tiger 900 Rally Pro आणि Scrambler 1200 X सारख्या हाय एंड बाईकसाठी चाकं तयार करतात.
  • Scrambler 400 X च्या चाकांची खरेदी करायची झाल्यास पुढील चाकं 34876 रुपये आणि मागील चाकं 36875 रुपयांना उपलब्ध आहेत.

तुलना थेट एनफिल्डशी….

  • रॉयल एनफिल्डनं हल्लीच ट्यूबलेस स्पोकव्हील्सच्या दरात वाढ केली.
  • सदर वाढीनंतर ही चाकं 40655 रुपयांना असून त्यात व्हीलसेट समाविष्ट आहे. यासाठीचा इन्स्टॉलेशन खर्च वेगळ्यानं भरावा लागणार आहे.
  • एनफिल्डच्या तुलनेत ट्रायम्फचे स्पोक व्हील्स स्वस्त पडत असून क्वालिटी आणि ड्युरेबलिटीच्या बाबतीतसुद्धा उजवे ठरत आहेत.

बाईकिंग क्षेत्रातील जाणकार आणि अनुभवी व्यक्तींच्या मते Triumph Scrambler 400 XC ही बाईक तिच्या किमतीच्या तुलनेत व्हॅल्यू फॉर मनी असून तिची चाकं हीच बाईकची जमेची बाजू ठरत आहेत. याशिवाय रग्ड डिझाईन, लो मेंटनन्स खर्च, कमाल बिल्ड क्वालिटी आणि सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या अद्ययावत साधनांमुळं ही बाईक पैसा वसूल ठरेल यात शंका नाही.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24