Toyota Urban Cruiser Hyryder: टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर ही भारतातील एक एसयूव्ही आहे जी मारुतीच्या ग्रँड विटाराची रिबॅज्ड वेरिएंट आहे. ग्रँड विटारा प्रमाणेच यामध्येही हायब्रिड तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ज्यामुळे ही कार उत्कृष्ट मायलेज देतेच. यासोबत उतार असलेल्या भागातही चांगला परफॉर्मन्स देते. ज्यामुळे ती चालवणे एक मजेशीर अनुभव असतो.
या 5 सीटर एसयूव्हीची किंमत 14 लाख रुपयांपासून सुरू होते. जी 24 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कारची एक्स-शोरूम किंमत आहे. ही कार 4 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ई, एस, जी आणि व्ही या 4 प्रकारात ही कार उपलब्ध आहे. यात सात मोनोटोन आणि चार ड्युअल-टोन रंगाचे पर्याय आहेत. एसयूव्ही प्रीमियम एसयूव्हीचा लूक आणि फील देते. ज्यामुळे ग्राहकांना एक मजेशीर अनुभव मिळतो. पुरेशी जागा मिळणे ही देखील एसयूव्ही कारची जमेची बाजू आहे.
इंजिन आणि पॉवर
टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरमध्ये तुम्हाला 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह माइल्ड-हायब्रिड आणि स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेनचा पर्याय मिळतो. स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेन 116 पीएस पॉवर जनरेट करते. ज्यामध्ये ई-सीव्हीटी गिअरबॉक्स आहेत. माइल्ड-हायब्रिड पॉवरट्रेन 102 पीएस पॉवर देते. ज्यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. त्यात ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टमचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
मायलेज आणि इतर फिचर्स
स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेन 28 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते. याशिवाय माइल्ड-हायब्रिड इंजिनसह येणारा सीएनजी व्हेरिएंट 26.6 किमी पर्यंत मायलेज देतो. कारमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, अँबियंट लाइटिंग, स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी असे अनेक फिचर्स आहेत.
‘या’ कारवर मिळतोय 4 लाखांपर्यंत डिस्काउंट
सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या कार लॉन्च होत आहेत. एकपेक्षा एक फीचर्स आणि मायलेज देणाऱ्या कारला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण जास्त किंमत असल्यामुळे अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न अपू्र्ण राहते. मात्र, आता एखाद्याचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.कारण एका कंपनीने त्यांचा स्टॉक कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर कार विकल्या जाव्यात म्हणून कारवर 4 लाखांपर्यंत सूट देण्यात आली आहे. या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात स्टॉक शिल्ल्क आहे. ज्यामध्ये 8 ते 10 टक्के कार या 2024 मध्ये तयार झाल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते मे महिन्यात 1,223 कार विकल्या गेल्या.त्यामुळे 2024 मध्ये आलेल्या हुंडई आयनिक 5 ईव्हीवर 4 लाखांपर्यंत सूट मिळत आहे. तर फोक्सवॅगन तिगुआनचे स्पोर्ट्स व्हर्जनवर 2.5 लाखांपर्यंत सूट मिळत आहे. हुंडई आयनिक 5 ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 480 किलोमीटर अंतर पार करते. या कारमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. हुंडई आयनिक 5 या कारची एक्स शोरुम किंमत ही सुमारे 46.30 लाख रुपये इतकी आहे. या कारची किंमत वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी आहे. रेनॉल्ट, निसान जीप, सिट्रोएन आणि स्कोडा या कारवर कंपन्या 1 लाखांपर्यंत सूट देत आहे. तर टाटा मोटर्स टियागो, पंच आणि कर्व्ह ईव्हीवर 70 ते 1 लाखांपर्यंत सूट मिळत आहे.