Tata ची ‘ही’ पैसा वसूल कार जिंकतेय अनेकांचाच विश्वास; किंमतीसह पाहा ती इतकी खास का…


Tata Harrier EV: भारतीय (Auto News) ऑटो क्षेत्रामध्ये काही ब्रँडच्या कारना वाहनप्रेमींची विशेष पसंती असते. TATA हा त्यातलाच एक ब्रँड. मुळात भारतामध्ये टाटा या नावाशीच विश्वासार्हता जोडली गेल्या कारणानं या कंपनीच्या कारसुद्धा सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. अशाच एका कारमध्ये कंपनीकडून काही अद्ययावर फिचरसुद्धा जोडले जात असून, त्यामुळं ही कार खऱ्या अर्थानं ‘पैसा वसूल कार’ ठरत आहे. 

जून 2025 मध्ये टाटानं Tata Harrier EV अर्थात हॅरियर कारचं इलेक्ट्रीक व्हेरिएंट लाँच केलं. मुळातच ही एसयुव्ही अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, खर्च करण्याच्या मर्यादेनुसार कोणतं व्हेरिएंट योग्य ठरेल हेसुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं. 

Harrier EV च्या आतापर्यंत लाँच केलेल्या व्हेरिएंटपैकी एक आहे  Fearless + 75. जाणकारांच्या मते सर्वात संतुलित आणि खर्च केलेल्या पैशांना ही कार न्याय देते. कमाल रेंज आणि सेगमेंट लिडींग फिचर्ससह ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. Tata Harrier EV Fearless + 75 मध्ये काही प्राईम फिचर कंपनीनं जोडले आहेत. 

कारच्या Outer Design मध्ये शार्क फिन अँटिना, LED डीआरएल, प्रोजेक्टर हेडलँप, बॉडी कलर्ड बंपर आणि स्टायलिश स्पॉयलर देण्यात आले आहेत. तर, केबिनमध्ये ड्यूअल झोन एसी, सनरुफ, वायरलेस चार्जर, लेदरेट- वेंटिलेटेड सीट अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्यामुळं ही कार प्रवासादरम्यान एक प्रिमियम अनुभव देते. 

इंजिन आणि सेफ्टी टेक्नोलॉजी 

Harrier EV Fearless + 75 मध्ये 75 kWh इतकी मोठी बॅटरी असून ती 627 किमी इतकी रेंज देते. या कारची रिअल वर्ल्ड रेंज 480, 505 किमी इतकी सांगण्यात येते. PMSM मोटर असल्यानं ही कार 238 PS पॉवर आणि 315 Nm चा टॉर्क जनरेट करते. 

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दासुद्धा कंपनीनं केंद्रस्थानी ठेवला असून, कारमध्ये 7 एअरबॅग दिल्या आहेत. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), सर्व चाकांना डिस्क ब्रेक, पार्किंग सेंसर, ISOFIX माउंट्स, 31.24 सेमी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम,  Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, 6 स्पीकर आणि 4 ट्वीटरचं ऑडियो सिस्टीम कारमध्ये देण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : आधी क्लच दाबावा की ब्रेक? अजाणतेपणे भारतीय करत आहेत एक मोठी चूक 

कारचालकाला उत्तम अनुभव देण्यासाठी 6 ड्राईव्ह मोड यामध्ये देण्यात आले आहेत. ईको, सिटी, स्पोर्ट, नॉर्मल, वेट आणि रफ टेरेन असे ते मोड आहेत आणि राहिला मुद्दा किमतीचा, तर या कारच्या व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 24.99 लाख रुपये असून, त्यातील फिचर्स, रेंज आणि कारचा एकंदर परफॉर्मन्स पाहता ही कार पैन्-पै वसूल करेल असाच दावा कंपनी करते. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24