Smartphone Hacks In Marathi: स्मार्टफोनचा वापर आजकाल दररोज होताना दिसतोय. स्मार्टफोनमध्ये अलीकडच्या काळात अनेक इन बिल्ट फिचर्स आहेत ज्यामुळं तुमच्या रोजच्या आयुष्यातील गोष्टी फार सोप्या होतील. मात्र काही Keys किंवा फंक्शन असे असतात जे कित्येकांना ठावूक नसतात. तुम्ही कधी स्मार्टफोनच्यावर एक छोटेसे छिद्र पाहिले आहे का. अनेकजण ही डिझाइन असल्याचे समजून सोडून देतात किंवा मायक्रोफोन वा सेन्सर असल्याचा समज करुन घेतात. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हे छोटेशे छिद्र खरं म्हणजे फार कामाचा भाग आहे. ज्याला IR Blaster असं म्हणतात. हे तुमचा फोन युनिव्हर्सल रिमोटमध्ये बदलू शकतात. ज्यामुळं तुम्ही घरातील टीव्ही, एसी, सेटटॉप बॉक्स आणि अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नियंत्रणात ठेवू शकतात. जाणून घेऊयात ही ट्रिक कशी काम करते.
तुमच्या फोनमध्ये लपलेला हा छोटासा रिमोट कंट्रोल खूप कामाचा आहे. याला IR Blaster असं म्हटलं जातं. हे एक छोटेसे हार्डवेअर कॉम्पोनेंट असतं. हे इन्फ्रारेड लाइट सिग्नल पाठवतात. जसं आपल्या घरातील टीव्ही किंवा एसीसारखे पांरपारिक रिमोट कंट्रोल काम करतात. हे इन्फ्रारेड सिग्नल त्या इलेक्ट्रोनिक डिव्हाइसने रिसिव्ह होतात ज्यात इंफ्रारेड टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात आणि मग कमांडनुसार काम करतात. जसं की चॅनेल बदलणे, आवाज कमी करणे, AC चे टेम्परेचर बदलणे.
कसं काम करतो IR Blaster ?
IR Blaster जर तुम्हाला वापरता येत असेल तर त्यासाठी तुम्हाला कम्पॅटिबल अॅप डाउनलोड करण्याची गरज आहे.
Step 1: अॅप डाउनलोड करा
जर तुमच्या फोनमध्ये IR Blaster आहे तर कंपनीकडून आधीपासून तुमच्या फोनमध्ये रिमोट कंट्रोल अॅप असेल. Xiaomi सारख्या कंपन्या त्यांच्या फोनमध्ये MI Remote अॅप देते.
जर तुमच्या फोनमध्ये आधीपासून अॅप असेल तर तुम्ही IR Blaster साठी Peel Smart Remote, AnyMote Universal Remote + WiFi, किंवा Universal TV Remote Control डाउनलोड करू शकता.
स्टेप 2- डिव्हाइस निवडा आणि कॉन्फिगर करा
जेव्हा पण तुम्ही अॅप ओपन कराल तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला टीव्हीचा ब्रँड उदा सोनी, एलजी किंवा पॅनासॉनिक याची निवड करायची आहे. तुम्ही AC, Tv, Fan सारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची निवडदेखील करू शकता. अॅपमध्ये काही टेस्ट सिग्नल पाठवून तुम्ही डिव्हाइससोबत पेअरिंग करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ऑनस्क्रीन इन्स्ट्रक्ंशन फॉलो करावे लागतील. जसं की पॉवर ऑन/ऑफ बटण, व्हॉल्यूम अप/डाउन बटण
स्टेप 3- कंट्रोल सुरू करा
एकदा कॉन्फिगरेशन झाल्यानंतर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर डिव्हाइसचा व्हर्चुअल रिमोट बनेल. तुम्ही फोननेच आरामात कंट्रोल करू शकता.
कोणत्या फोनमध्ये असते हे फिचर्स
फोनमध्ये अनेक अपग्रेड होत असतात. जुने फक्ंशन आणि डिझाइन बदलले असतात. IR ब्लास्टर आजच्या जमान्यात सर्व स्मार्टफोन्समध्ये नाहीये. मात्र काही कंपन्या आहेत ज्या पहिलेपासून हे फिचर त्यांच्या फोनमध्ये देतात. जसं की, Xiaomi, Redmi, Oppo, Poco, Samsung. मात्र Apple युजर्स याचा वापर करू शकत नाही.
आयआर ब्लास्टरचे फायदे काय आहेत?
युनिव्हर्सल रिमोट: तुम्हाला वेगवेगळ्या उपकरणांसाठी वेगवेगळे रिमोट ठेवण्याची आवश्यकता नाही.
किती फायदेशीर?: रिमोट हरवण्याचा किंवा बॅटरी संपण्याचा कोणताही त्रास राहणार नाही. फोन नेहमीच जवळ असतो, त्याद्वारे तो वापरता येतो.
स्मार्ट वापर: काही अॅप्स कस्टमाइज्ड रिमोट तयार करणे, आवडते चॅनेल सेट करणे किंवा व्हॉइस कमांड देणे यासारखी स्मार्ट वैशिष्ट्ये देखील देतात.
किफायतशीर: जर तुमच्या फोनमध्ये हे वैशिष्ट्य असेल, तर तुम्हाला वेगळे युनिव्हर्सल रिमोट खरेदी करण्याची आवश्यकता नाही.