टाटा मोटर्सचा नवा टप्पा: देशातील सर्वात स्वस्त चार चाकी मिनी-ट्रक एस प्रो लाँच, किंमत 3.99 लाख – Pune News



टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने नवीन टाटा एस प्रोच्‍या लाँचसह नवीन टप्‍पा गाठला आहे, तसेच लहान कार्गो मोबिलिटीच्‍या परिवर्तनात्‍मक युगाचा शुभारंभ केला आहे. ₹3.99 लाख रूपयांच्‍या सूरवातीच्‍या किमतीसह टाटा एस प्र

.

उद्योजकांच्‍या भावी पिढीला सक्षम करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला टाटा एस प्रो पेट्रोल, बाय-फ्यूईल (सीएनजी + पेट्रोल) आणि इलेक्ट्रिक व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांच्‍या व्‍यवसाय गरजांसाठी योग्‍य सोल्‍यूशन निवडण्‍याची स्थिरता मिळते.

ग्राहक देशभरातील टाटा मोटर्सच्‍या १२५० कमर्शियल वेईकल्‍स विक्री टचपॉइण्‍ट्सपैकी कोणत्‍याही टचपॉइण्टमध्‍ये किंवा टाटा मोटर्सचे ऑनलाइन विक्री प्‍लॅटफॉर्म फ्लीट व्‍हर्सवर त्‍यांचे पसंतीचे एस प्रो व्‍हेरिएण्‍ट बुक करू शकतात. टाटा एस प्रोच्‍या मालकीहक्‍काला सोईस्‍कर करण्‍यासाठी टाटा मोटर्सने आघाडीच्‍या बँका व एनबीएफसींसोबत सहयोग केला आहे, ज्‍यामधून विनासायास फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍ससह त्‍वरित कर्ज मंजूरी, स्थिर ईएमआय पर्याय आणि सुधारित फंडिंग सपोर्ट देण्‍यात येईल. यासह ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता होण्‍याची खात्री मिळते.

एस प्रो लाँच करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्‍हणाले, लाँच करण्‍यात आलेल्‍या टाटा एसने भारतातील कार्गो मोबिलिटीमध्‍ये क्रांती घडवून आणली. गेल्‍या दोन दशकांमध्‍ये या ट्रकने २५ लाखांहून अधिक उद्योजकांना यशस्‍वीरित्‍या सक्षम केले आहे, तसेच प्रगती व क्षमतेचे प्रतीक बनला आहे. नवीन टाटा एस प्रोसह आम्‍ही महत्त्वाकांक्षी भावी पिढीसाठी नवीन उद्देशासह हा वारसा अधिक दृढ करत आहोत. स्थिरता, सुरक्षितता आणि नफ्यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या एस प्रोमध्‍ये उत्तम उत्‍पन्‍न मिळवून देण्‍याची क्षमता आहे.

टाटा एस प्रोबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या एससीव्‍हीपीयूचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख पिनाकी हल्‍दर म्‍हणाले, उद्देशपूर्ण टाटा एस प्रो सखोल ग्राहक अभिप्रायांसह विकसित करण्‍यात आली आहे आणि विविध उपयोजनांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. विविध प्रदेश व हवामान स्थितींमध्‍ये, तसेच लाखो किलोमीटर अंतरापर्यंत या ट्रकची प्रखर चाचणी करण्‍यात आली आहे. मल्‍टी-फ्यूईल पर्याय, किफायतशीरपणा आणि सुधारित ड्रायव्हिंग क्षमतेसह टाटा एस प्रो विविध वापरांमध्‍ये उच्‍च दर्जाचे मूल्‍य देतो. आमच्‍या पोर्टफोलिओमधील हा धोरणात्‍मकरित्‍या भर करण्‍यात आलेला ट्रक आहे,जो उद्योजकांना आणि लहान व्‍यवसायांना विश्‍वासार्ह, भविष्‍यासाठी सुसज्‍ज गतशीलता प्रदान करतो.

भारतातील व्‍यावसायिक,ई-कॉमर्स व लॉजिस्टिक्‍स हब महाराष्‍ट्र एस प्रो बाय-फ्यूईल आणि ईव्‍ही व्‍हेरिएण्‍ट्ससाठी लाभदायी क्षेत्र आहे.याराज्‍यातील ग्राहक या ऑफरिंग्‍जचा फायदा घेण्‍यास अद्वितीयरित्‍या सज्‍ज आहेत, जेथे राज्‍यामध्‍ये प्रबळ सीएनजी पायाभूत सुविधा असण्‍यासोबत शाश्‍वत परिवहन सोल्‍यूशन्‍सना पाठिंबा देणा-यसा इलेक्ट्रिक गतीशीलतेचा लवकर अवलंब करण्‍यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24