मी डोनेट केलेल्या Sperm मधून 12 देशात जन्मली 100 बाळं; प्रत्येकाला देणार 1670 कोटी रुपये पण…; अब्जाधीशाची घोषणा


Sperm Donations Born Kids Will Get Property: श्रीमंत लोक कधी काय करतील याचा भरवसा नसतो, असं म्हटलं जातं. असाच काहीसा प्रकार आता टेलिग्राम या लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशनचे संस्थापक आणि अब्जाधीश पावेल दुरोव यांनी केला आहे. पावेल दुरोव यांनी एक खुलासा केलाय. मी माझी सुमारे 20 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.67 लाख कोटी रुपये) किमतीची मालमत्ता स्पर्म डोनेट करुन जन्मलेल्या 100 मुलांमध्ये वाटणार आहे, असं दुरोव यांनी जाहीर केलं आहे. ‘ले पॉइंट’ या फ्रेंच मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दुरोव यांनी ही माहिती दिली. मी अलीकडेच माझे मृत्युपत्र तयार केले आहे, ज्यामध्ये या निर्णयाचा समावेश आहे, असं दुरोव यांनी स्पष्ट केलं आहे.

दान केलेल्या स्पर्ममधून 15 वर्षात 12 देशांमध्ये जन्मली 100 हून अधिक मुलं

पावेल दुरोव यांनी सांगितले की, त्यांनी 15 वर्षांपूर्वी एका मित्राला मदत करण्यासाठी शुक्राणू म्हणजेच स्पर्म दान करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी दान केलेल्या स्पर्ममधून 12 वेगवेगळ्या देशांमध्ये 100 हून अधिक मुले जन्माला आली आहेत. “मी या मुलांना स्वतःच्या मुलांसारखे मानतो. माझ्यासाठी ही सर्व मुले समान आहेत, मग ती माझ्या जोडीदारापासून जन्मलेली असोत किंवा स्पर्म डोनेशनमधून जन्मलेली असोत,” असं दुरोव म्हणाले.

तो त्याच्या मुलांना ३० वर्षे वारसाहक्कापासून दूर ठेवेल

स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून जन्मलेल्या मुलांनी कठोर परिश्रम करावेत, स्वतःचे जीवन घडवावे आणि केवळ आपण वारसा हक्काने दिलेल्या पैशावर अवलंबून राहू नये, अशी दुरोव यांची माफक अपेक्षा आहे. मात्र हीच अपेक्षा डोक्यात ठेवत त्यांनी या मुलांना संपत्ती देण्याच्या निर्णयाबरोबरच एका अटीचाही समावेश केला आहे. दुरोव यांची मुलं पुढील 30 वर्ष वडीलांच्या संपत्तीचा, मालमत्तेचा वापर करू शकणार नाहीत. असा थेट उल्लेखच मृत्यूपत्रात करण्यात आलाय.

…म्हणून लवकर लिहिलं मृत्यूपत्र

कुटुंबसंस्थेचा तुमच्या लेखी नेमका काय अर्थ आहे असे विचारले असता दुरोव यांनी, “कुटुंब हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे,” असं उत्तर दिलं. एवढ्या लवकर मृत्यूपत्र लिहून ठेवण्याचं कारही दुरोव यांनी सांगितलं आहे. “मृत्युपत्र लवकर लिहिण्यामागील कारण म्हणजे मी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करतो ज्यामुळे मी काही शक्तिशाली देशांसह अनेक शत्रू बनवले आहेत,” असा खुलासाही दुरोव यांनी केला. दुरोव यांच्या संपत्तीचा विचार केल्यास 100 मुलांमध्ये त्यांची संपत्ती वाटल्यास प्रत्येकाच्या वाट्याला 1670 कोटी रुपये येतील.

मृत्यूनंतर टेलिग्रामचं काय होणार याची काळजी

दुरोव यांना वाटते की त्यांनी तयार केलेले टेलिग्राम प्लॅटफॉर्म त्यांच्या मृत्यूनंतरही स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिले पाहिजे. म्हणूनच, त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत एक ना-नफा ना तोटा तत्वावर काम करारी संस्था टेलिग्राम हाताळेल असं नमूद करु ठेवलं आहे.

अनेकांनी करुन दिली त्या विधानाची आठवण

दुरोव यांनी स्पर्म डोनेशनमधून जन्मलेल्या मुलांनाही आपल्या मुलांचा दर्जा दिला असतानाच अनेकांनी दुरोव यांनी काही काळापूर्वी मला माझ्या मुलांना माझ्यावर निर्भर राहू द्यायचं नाहीये असं म्हटलं होतं याची आठवण करुन दिली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24