मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर 1.75 लाखांहून अधिक ध्वनी अवरोधक बसवले आहेत

मुंबई (mumbai) -अहमदाबाद (ahmedabad) बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर (bullet train corridor)नॉईज बॅरियर बसवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत, 87.5 किमीच्या परिसरात नॉईज बॅरियर बसविण्यात आले आहेत. गुजरातमध्ये (gujrat) 1,75,000 हून अधिक नॉईज बॅरियर बसवण्यात आले आहेत.

1 किमीच्या पट्ट्यासाठी कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूला 2000 नॉईज बॅरियर (noise barrier) बसवणार आहेत. नॉईज बॅरियरच्या निर्मितीसाठी सुरत, आणंद आणि अहमदाबाद येथे या मॉड्यूलर घटकासाठी तीन प्री-कास्ट कारखाने स्थापन करण्यात आले आहेत.

हे नॉईज बॅरियर ऑपरेशन दरम्यान ट्रेन द्वारे निर्माण होणारा आवाज कमी करण्यासाठी बसवले जाणार आहेत. हे नॉईज बॅरियर रेल्वे पातळीपासून 2 मीटर उंच आणि 1 मीटर रुंद असे काँक्रीट पॅनेल आहेत.

प्रत्येक नॉईज बॅरियर सुमारे 830-840 किलो वजनाचा असतो. हा आवाज ट्रेनच्या खालच्या भागाद्वारे म्हणजेच प्रामुख्याने रुळांवर चालणाऱ्या चाकांमुळे निर्माण होतो. शहराबाहेरील आणि शहरी भागातून जाणाऱ्या कॉरिडॉरमध्ये 3 मीटरचे उंच नॉईज बॅरियर असतील.


हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24