मनात जबरदस्त इच्छा असेल तर कोणतीही अशक्य कोटीतील गोष्ट सहज साध्य होते.असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून तो पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. हा व्हिडिओ मंगळूरू येथील असल्याचे सांगितले जात आहे. येथे एका मुलीची आई भरधाव रिक्षाने धडक दिल्यानंतर रिक्षाखाली दबली जाते. हे पाहून शाळकरी मुलगी पळत येऊन एकटीच रिक्षा उचलून बाजुला करते. यामुळे तिच्या आईचा जीव वाचतो. व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी मुलीच्या बहादुरीचे कौतुक केले असून तिला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी होऊ लागली आहे.