Mumbai Dabbawala in school syllabus : मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाल्याची कहाणी लवकरच घराघरात पोहोचणार आहे. केरळ सरकारने त्यांना शालेय अभ्यासक्रमाचा भाग करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पाठ्यपुस्तकातील पाच पानांच्या अध्यायात नववीच्या इंग्रजी अभ्यासक्रमात डबेवाल्यांची कहाणी समाविष्ट करण्यात आली आहे. ‘टिफिन वाहतुकीची गाथा’ असे या अध्यायाचे नाव असून याचे लेखक ह्यू आणि कोलीन गँटझर त्यांच्या प्रवास कथा लिहितात. केरळ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) २०२४ च्या नव्या अभ्यासक्रमात डबेवाल्यांच्या प्रेरणादायी कथेचा समावेश केला आहे.