भाजपच्या गुंडगिरी विरोधात लढू, भिडू आणि जिंकू: आम्ही काँग्रेसचे बब्बरशेर कार्यकर्ते, वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल – Mumbai News



भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात शिरले. यावेळी कार्यकर्त्यांकडून कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड यांच्या फोटोंवर काळी शाही फेकण्य

.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ऐकताच का कोणास ठाऊक पण मनुवादी आरएसएस-भाजपाने नेहमी हेच केले… हल्ले आणि तोडफोड. अमित शाह ने देशाचे उद्धारक बाबासाहेब आणि आंबेडकरी चळवळीचे अपमान केले आहे. आता त्यांना वाचवण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप गुंडगिरीवर आली असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, भाजपच्या 50 गुंडांनी आमच्या कॉंग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. खुर्च्या फेकल्या, पोस्टर्स फाडले, आणि मालमत्तेची तोडफोड केली. ही गुंडशाही नाही तर काय आहे. या भ्याड हल्लाच्या मी तीव्र निषेध करते. पण यांच्या गुंडगिरीला आम्ही भिक घालत नाही. आम्ही काँग्रेसचे बब्बरशेर कार्यकर्ते आहोत. आम्ही लढू, भिडू आणि जिंकू. आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत.

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करते की महाराष्ट्र कायद्याचा राज्य आहे की नाही? भाजपच्या या गुंडांवर कठोर कलमांतर्गत कारवाई करावी आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी. सत्तेत असले तरी काय? महाराष्ट्र भाजपची गुंडशाही खपवून घेणार नाही, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दरम्यान, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याविरोधात वेळीच पाऊले उचलत लाठीचार्ज केला. यामुळे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून काढता पाय घेतला. पोलिसांनी या प्रकरणी काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24