भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात शिरले. यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न
.
भाजयुमोचे कार्यकर्ते गुरुवारी दुपारी अचानक मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात शिरले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. मुंबई विभागीय काँग्रेस समिती राजीव गांधी भवन येथे हा प्रकार घडला. यावेळी जमावाकडून कार्यालयावर खुर्च्या, शाई आणि दगडफेक केल्याची माहिती आहे. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, परंतु जमाव जुमानत नसल्याने पोलिसांनी वेळीच पाऊले उचलत लाठीचार्ज केला. याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बातमी अपडेट करत आहोत…