राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काही तासांवर येऊन ठेपला आहे. यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर इच्छुकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. भाजपसह शिवसेने नेते सीएम फडणवीसांची भेट घेत मंत्रिपदासाठी लॉबिंग करताना दिसून येत आहे.
.
भाजपचे मराठवाड्यातील आमदार संतोष दानवे, संजय राठोड, राधाकृष्ण विखे पाटील, संजय शिरसाट, प्रकाश सोळंके, राहुल आवाडे हे फडणवीस यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. यातील किती आमदारांना मंत्रिपद मिळणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
अजितदादा-शिंदेंची लिस्ट फायनल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात होणार आहे. यासाठी संभाव्य मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस फोन करणार आहेत. यामुळे आता कुणाकुणाला फोन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न होऊ शकल्याने विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदेंनी 5 तास थांबून ही भेट न दिल्याने या चर्चांनी जोर धरला आहे. यामुळे आता आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेकांकडून फडणवीसांची भेट घेत लॉबिंग करण्याचा प्रयत्न होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची नावे अंतिम करून ती मुख्यमंत्री फडणवीस यांना कळविली असल्याची माहिती आहे. तर अजित पवार यांनी देखील आपल्या मंत्र्यांची यादी फायनल करत मुख्यमंत्री फडणवीसांना सोपवली आहे.
एकनाथ शिंदेंना कोणते खाते मिळणार?
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळ विस्तार मुंबईऐवजी नागपुरात व शनिवारऐवजी रविवारी केला जात आहे. दुसरीकडे, महायुती-2 सरकारमध्ये एकूण 34 ते 35 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यात भाजपला 23, शिवसेना शिंदे गटाला 13 व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 9 मंत्रिपदे मिळतील.
त्यापैकी मंत्रिमंडळ विस्ताराच्या रविवारी पार पडणाऱ्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या 17, शिवसेनेच्या 10 व अजित पवार गटाच्या 7 आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे यावेळी गृह व अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. एकनाथ शिंदे सरकारकडे अर्थ खाते हे अजित पवार यांच्याकडे होते. त्यामुळे यावेळी त्यांना या खात्यावर पाणी सोडावे लागणार असल्याची चर्चा आहे.
खाली वाचा भाजपचे संभाव्य मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन रवींद्र चव्हाण प्रवीण दरेकर मंगलप्रभात लोढा बबनराव लोणीकर पंकजा मुंडे आशिष शेलार संभाजी निलंगेकर जयकुमार रावल शिवेंद्रराजे भोसले नीतेश राणे विजयकुमार गावित देवयानी फरांदे राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे गोपीचंद पडळकर
आता शिवसेनेचे संभाव्य मंत्री
शंभुराज देसाई दादा भुसे संजय शिरसाट भरत गोगावले गुलाबराव पाटील उदय सामंत प्रताप सरनाईक विजय शिवतारे योगेश कदम राजेंद्र यड्रावकर प्रकाश आबिटकर