राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तथा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दिल्लीत मोठा बंगला मिळाला आहे. सामान्यतः पहिल्यांदा खासदार होणाऱ्या व्यक्तीला असा मोठा बंगला मिळत नाही. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या यशामुळे सुनेत्रां
.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुनेत्रा पवार यांना दिल्लीच्या लुटियन्सच्या 11 जनपथवरील टाईप -7 बंगला देण्यात आला आहे. खास गोष्ट म्हणजे हा बंगला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 जनपथ स्थित टाईप -8 बंगल्याला अगदी चिकटून आहे. शरद पवार तिथे आपल्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहतात. सीनिअर पवार हे अजित पवार यांचे चुलते आहेत.
पहिल्यांदा खासदार होणाऱ्यांना मोठा बंगला मिळत नाही
लुटियन्समधील सुनेत्रा पवार यांचा टाईप -7 बंगला सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण, सुनेत्रा या यंदा प्रथमच खासदार बनल्या आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहोचलेल्या व्यक्तीला दुसऱ्या सर्वोच्च श्रेणीचा बंगला दिला जात नाही. पण सुनेत्रांना तो देण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. हा घटनानंतर लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच घडला होता.
अजित पवारांची दिल्लीत ताकद वाढली
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली होती. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला तब्बल 41 जागा मिळाल्या. याऊलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले. या कामगिरीमुळे अजित पवारांची दिल्लीतील ताकद वाढली आहे. यामुळेच सुनेत्रा पवार यांना दिल्लीत मोठा बंगल्याचे वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे.
कोण – कोण आहेत सुनेत्रांचे शेजारी?
उल्लेखनीय बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या शेजाऱ्यांत शरद पवारच नव्हे तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा…
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 तारखेला:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वपूर्ण माहिती; पवारांशी ‘इन जनरल’ चर्चा झाल्याचा दावा
नवी दिल्ली – महायुती सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार येत्या शनिवारी म्हणजे 14 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली. राज्यात सध्या मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. त्यामुळे सर्वांनाच इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? याविषयी उत्सुकता आहे. बहुतेक 14 तारखेला हा शपथविधी होईल, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर