देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी आपल्या निवड केल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. तसेच महाराष्ट्राला विकासाच्या एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्धारही व्यक्त केला. विशेषतः यावेळी त्या
.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी एकमताने भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. ही निवड प्रक्रिया करण्यासाठी आलेले केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारामन यांचेही मी आभार मानतो. खरे म्हणजे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की, यावेळची निवडणूक अत्यंत ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाले तर, तर मी असे म्हणेन की, या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यापुढे निश्चितपणे ठेवली आहे. ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है.
आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…