​​​​​​​महायुती आजच करणार सत्ता स्थापन करण्याचा दावा: दुपारी 3 वाजता घेणार राज्यपालांची भेट, प्रशासनाकडून शपथविधीची जय्यत तयारी – Mumbai News



राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना आता प्रचंड वेग आला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक विधानभवनात सुरू झाली आहे. या बैठकीत पक्षाचा गटनेता ठरल्यानंतर महायुतीचे नेते दुपारी 3 च्या सुमारास राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दाव

.

288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेची गत 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली. त्यानंतर 23 तारखेला झालेल्या मतमोजणीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. पण त्यानंतरही महायुतीला अद्याप सरकार स्थापन करण्यास यश आले नाही. अखेर आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षाचा गटनेता ठरवला जाईल. या बैठकीत भाजपचा गटनेता ठरवला जाणार आहे. या बैठकीनंतर महायुतीचे नेते दुपारी 3 च्या सुमारास राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहे. त्यांना महायुतीच्या आमदारांच्या समर्थनाचे पत्र सोपवून सत्ता स्थापन करण्याचा दावा सादर केला जाईल. त्यानंतर राज्यपाल महायुतीला सरकार स्थापन करण्याचे औपचारिक निमंत्रण देतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या सायंकाळी आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असे 3 जणच शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपच्या विधिमंडळ पक्षनेता हाच राज्याचा नवा मुख्यमंत्री होणार आहे. भाजपने यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक 132 जागा मिळवल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रथमच भाजपला महाराष्ट्रात असा विक्रमी विजय मिळाला आहे. त्यामुळे तेच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी

दुसरीकडे, मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या सोहळ्याला देशभरातील 70 हून अधिक व्हीव्हीआयपी नेते उपस्थित राहणार आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय महामार्ग व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचा समावेश असणार आहे. याशिवाय भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारच्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे जवळपास 40 हजार कार्यकर्तेही या सोहळ्याला हजर राहणार आहेत. यात ‘एक है तो सेफ है’ चा संदेश देणारे टी शर्ट परिधान केलेल्या 10 हजार कार्यकर्त्यांचाही समावेश असेल.

फडणवीसांनी खास पाहुण्यांना दिले निमंत्रण

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील आपल्या काही खास मित्रांनाही सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. यात फडणवीस यांचे चाहते असणाऱ्या गोपाल बावनकुळे यांचाही समावेश आहे. गोपाल बावनकुळे हे नागपूरच्या रामनगर परिसरात चहाचा स्टॉल चालवतात.

खाली वाचा शपथविधी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

  • योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
  • चंद्राबाबू नायडू – मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
  • नितीन कुमार – मुख्यमंत्री, बिहार
  • प्रेमा खांडू – मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
  • हिमंत बिश्व शर्मा – मुख्यमंत्री, आसाम
  • विष्णूदेव साय – मुख्यमंत्री, छत्तीसगढ
  • प्रमोद सावंत – मुख्यमंत्री, गोवा
  • भूपेंद्र पटेल – मुख्यमंत्री, गुजरात
  • नायब सिंग सैनी – मुख्यमंत्री, हरियाणा
  • मोहन यादव – मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
  • कॉनराड संगमा – मुख्यमंत्री, मेघालय

खालील संत मंडळीही राहणार उपस्थित

  • नरेंद्र महाराज – नाणीज
  • नामदेव शास्त्री – भगवानगड
  • राधानाथ स्वामी महाराज- इस्कॉन
  • गौरांगदास महाराज- इस्कॉन
  • जनार्दन हरीजी महाराज
  • प्रसाद महाराज अंमळनेरकर
  • महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा व मोहन महाराज
  • जैन मुनी लोकेश



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24