मुंबईत गुजराती, मारवाडी बोला, ही मुंबई भाजपने जिंकली आहे. पण मुंबईत मराठी बोलायचे नाही, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. मुंबईमध्ये एकप्रकारची अराजकता निर्माण झाली आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे.
.
दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी माणसांवर हल्ले सुरू झाले आहेत. मराठी माणसांचे उद्योग, त्यांचा व्यापार, त्यांच्या नोकऱ्या बळकावल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला आहे.
..तर सरकार चालवणे किती कठीण
संजय राऊत म्हणाले की, बहुमत मिळूनदेखील भाजप महाराष्ट्रात वेळेवर सरकार स्थापन करू शकले नाही. पक्षांतर्गत कुरघोडी असो की मित्रपक्षाची कुरबुर यामुळे भाजपला अजून सरकार बनवता येत नाहीये. जर सरकार बनवायला इतकं कठीण जात असेल तर सरकार चालवणे किती कठीण जाईल हे आम्हाला दिसत आहे. जो तो महाराष्ट्राची आप आपल्या पद्धतीने कशी लुट करेल यांचे ट्रेलर आम्ही गेली 8 दिवस पाहत आहोत.
मुंबईत मराठी खपवून घेतली जाणार नसल्याची भाषा धोकेदायक
संजय राऊत म्हणाले की, मराठी माणसांसाठी काम करणारापक्ष अशी शावसेनेची ओळख आहे. खोटी का असेना पण शिवसेना सत्तेत असताना हे सर्व घडत आहे. हे चित्र मराठी माणसांच्या भविष्यासाठी खूप धोकेदायक आहे. भाजपचा विजसय होताच महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी बोलायचे नाही, ते खपवून घेतले जाणार नाही अश्या धमक्या दिल्या जातात. हे सर्व होत असताना महाराष्ट्राचे होणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे सर्व ऐकून घेतात हे दुर्देवी आहे.