खाडाखोड केलेली कागदपत्रे देणे, प्रशिक्षण कालावधीत चारचाकीवर अंबर दिवा लावणे आदींमुळे सहा महिन्यांपूर्वी पूजा खेडकर यांना सनदी सेवेतून बरखास्त करण्यात आले होते. त्यावेळी पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर जमिनीचा वादात समोरच्या व्यक्तीला पिस्तूल दाखवत धमकाव
.
या प्रकरणाची न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात मनोरमा यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी सांगितले की, परवाना रद्द करताना पुणे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही. हा मुद्दा ग्राह्य धरून न्यायालयाने पोलिसांचा निर्णय रद्दबातल केला. पिस्तूलाने धमकावल्याप्रकरणी १८ जुलै २०२४ रोजी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील हिरकणीवाडीतील एका लॉजमधून अटक केली होती. त्यानंतर मनोरमा यांच्यासह त्यांचे पती आणि इतर पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. दरम्यान ऑगस्ट २०२४ मध्ये मुळशी तालुक्यात जायचे नाही या अटीवर न्यायालयाने मनोरमा खेडकर आणि इतरांना जामीन मंजूर केला होता.
आरोपीसाठी टाकला होता पोलिस अधिकाऱ्यावर दबाव
पूजा खेडकरांनी प्रशिक्षणाच्या कालावधीत सरकारी निवास, कर्मचारी, गाडी आणि कार्यालयात वेगळ्या केबिनची मागणी केली होती. खासगी ऑडी मोटारीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र सरकारचा लोगो लावला. चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला सोडण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यावर दबाव टाकला. युपीएससी परीक्षा देण्यासाठी खोटे आणि छेडछाड केलेली कागदपत्रे वापरली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.