मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल, त्यानंतर जे करत आले तसेच करतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. या टीकेवररून भाजप नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेंबाबत आता उफा
.
राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठकांचा सिलसिला पार पडत आहे. या बैठकीला भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. या बैठकीसाठी प्रसाद लाड देखील आले होते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले प्रसाद लाड?
आतापर्यंत ड्रमगेट ते मेनगेट आणि मेनगेट तू ड्रमगेटच्या बाहेर उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात ते फक्त तीन वेळा गेले. त्यांनी फेसबुक लाईव्हवर सरकार चालवले आता उफाळलेले प्रेम आधी उफाळले असते, तर एकनाथ शिंदे त्यांना सोडून गेले नसते, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना सातत्याने वाईट वागणूक दिल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आमदार बाहेर पडले. आता उरलेले आमदारही बाहेर पडतील, अशी त्यांना भीती आहे, त्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.
प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांना महायुती सरकारच्या शपथविधीचे आमंत्रण दिले जाईल की नाही, यावरही प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले जाईल, शपथविधीला यायचे की नाही, हे त्यांच्यावर आहे. कोणत्या मनाचे ते लक्षण दाखवू शकतात, असे प्रसाद लाड म्हणाले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांना गोंजारेल. पण एकदा निवडणुकीचा हेतू साध्य झाला की, त्यांचे काय करायचे ते करेल. भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आव आणून आपल्या विविध यंत्रणा राबवल्या. त्यांनी आरएसएसचा वापर केवळ पत्रके वाटण्यापुरता केला. सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या वादात शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. भाजपचा मूळ उद्देश मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा आहे, असे उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांच्या बैठकीत म्हणाले होते.