विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला दैदिप्यमान विजय मिळाला. त्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाजपच्या गोटातील माहितीनुसार, सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप
.
राज्यातील महायुती सरकारचा येत्या 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. महायुतीमधील तिन्ही घटकपक्षांनी या सोहळ्याचे सर्वच महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश हरियाणा या भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय विविध राज्यांचे राज्यपालही या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्याची शक्यता आहे.
शपथविधी स्थळी ‘एक है तो सेफ है’ चा संदेश
दुसरीकडे, राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. पण भाजप ऐनवेळी धक्कातंत्र राबवण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व साधूसंत उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 40 हजार कार्यकर्तेही या सोहळ्याला हजर राहणार आहेत. यात ‘एक है तो सेफ है’ चा संदेश देणारे टी शर्ट परिधान केलेल्या 10 हजार कार्यकर्त्यांचाही समावेश असेल.
फडणवीसांनी खास पाहुण्यांना दिले निमंत्रण
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील आपल्या काही खास मित्रांनाही या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. यात फडणवीस यांचे चाहते असणाऱ्या गोपाल बावनकुळे यांचाही समावेश आहे. गोपाल बावनकुळे हे नागपूरच्या रामनगर परिसरात चहाचा स्टॉल चालवतात.
सीएम एकनाथ शिंदेही झाले सक्रिय
उल्लेखनीय बाब म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी सक्रिय झालेत. त्यांनी आज सकाळी आपले 2 आमदार आझाद मैदानावरील तयारीची पाहणी करण्यासाठी पाठवले होते. शपथविधी सोहळ्याच्या तयारीपासून शिवसेना अलिप्त राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. पण आता शिवसेनेचे नेते आझाद मैदानावर पोहोचल्यामुळे या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
खाली वाचा शपथविधी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे
योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
चंद्राबाबू नायडू – मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
नितीन कुमार – मुख्यमंत्री, बिहार
प्रेमा खांडू – मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
हिमंत बिश्व शर्मा – मुख्यमंत्री, आसाम
विष्णूदेव साय – मुख्यमंत्री, छत्तीसगढ
प्रमोद सावंत – मुख्यमंत्री, गोवा
भूपेंद्र पटेल – मुख्यमंत्री, गुजरात
नायब सिंग सैनी – मुख्यमंत्री, हरियाणा
मोहन यादव – मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
कॉनराड संगमा – मुख्यमंत्री, मेघालय
खालील संत मंडळीही राहणार उपस्थित
नरेंद्र महाराज – नाणीज
नामदेव शास्त्री – भगवानगड
राधानाथ स्वामी महाराज- इस्कॉन
गौरांगदास महाराज- इस्कॉन
जनार्दन हरीजी महाराज
प्रसाद महाराज अंमळनेरकर
महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा व मोहन महाराज
जैन मुनी लोकेश