​​​​​​​शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: सोलार पंप योजनेत व्हेंडर निवडीची सुविधा उपलब्ध; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया – Mumbai News



शेतकऱ्यांची वीज बिल व अवेळी होणाऱ्या वीज पुरवठ्यापासून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना आपल्या पसंतीचा व्हेंडर निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

.

बाजारात उपलब्ध सर्व सौर कृषी पंप कंपनीच्या किंमती जवळपास एक सारख्याच आहेत. त्यात 5 वर्षाची वॉरंटी तसेच सर्व धोक्यांपासून कव्हर देणारी विमा पॉलिसी पुरवठादारांकडून शेतकऱ्यांना देण्यात येते. एकूण किमतीच्या 90 ते 95% अनुदान शेतकऱ्यांना मिळते. म्हणजे साधारणतः 2 लाखांचा 3 HP चा सोलार पंप शेतकऱ्यांना अवघ्या 20 हजार रुपयांत उपलब्ध होतो.

महाराष्ट्रात सौर कृषी पंप मान्यतेची अंमलबजावणी 2 संस्था करतात. यात महावितरण व महाराष्ट्र ऊर्जा विकास एजंसीचा समावेश आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेने एकूण 5लाख 5 हजार सौर कृषी पंप मंजूर केलेत. त्यापैकी 1,63,906 सोलार पंप स्थापितही केले आहेत. दुसरीकडे, महावितरणने एकूण 700 सौर कृषी पंप मंजूर केले असून त्यापैकी केवळ 7 सौर कृषी पंप स्थापित केले आहेत.

प्रस्तुत योजनेंतर्गत महाराष्ट्रात विविध 22 कंपन्या सौर कृषी पंपांचा पुरवठा करतात. ज्या शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेचे अर्ज करून शुल्क भरलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी प्रथम टप्प्यात जिल्ह्यानुसार 14 पुरवठा विक्रेते निवडता येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना 90% अनुदानाबरोबरच आपल्या आवडीच्या कंपनीचा सौर कृषी पंपही निवडण्याची मुभा मिळणार आहे.

खाली पाहा व्हेंडर निवडीची प्रक्रिया

  • सर्वप्रथम महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index.php या संकेतस्थळावर लॉग इन करा.
  • महावितरणच्या पोर्टलवर जाऊन ‘लाभार्थी सुविधा’ हा पर्याय निवडा.
  • लाभार्थी सुविधा पर्यायात अर्जाची सद्यस्थिती तपासा.
  • आपला अर्ज क्रमांक टाका. आपल्या एमटी आयडी/एमएस आयडी/एमके आयडी या क्रमांकाचा वापर करून अर्जाची माहिती शोधा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल. आपले पेमेंट पूर्ण झालेले दिसेल.
  • यानंतर व्हेंडर निवड करा
  • व्हेंडर निवडीसाठी उपलब्ध यादी तुम्हाला दिसेल.
  • या ठिकाणी तु्म्हाला 3 एचपी, 5 एचपी किंवा 7.5 एचपी क्षमतेसाठी व्हेंडर निवडता येईल.
  • तुमच्या जिल्ह्यात जिथे व्हेंडर उपलब्ध असेल त्याची यादी तुम्हाला दिसेल.
  • व्हेंडर निवडून असाइन या बटनावर क्लिक करा
  • तुमच्या पसंतीचा व्हेंडर निवडून Assign Vendor पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर OTP प्रक्रिया पूर्ण करा.
  • व्हेंडर निवडल्यानंतर आपल्या मोबाईलवर आलेला OTP सबमिट करून व्हेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करा.
  • तुम्हाला या ठिकाणी तुम्ही निवडलेल्या व्हेंडरच्या कामगिरीचा आढावाही घेता येईल. यात व्हेंडरने तुमच्या जिल्ह्यात कुठे – कुठे इन्स्टॉलेशन केले आहे, ती सर्व माहिती तुम्हाला पाहता येईल.
  • वरील सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमचे व्हेंडर सिलेक्शन पूर्ण होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24