माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकवाडीच्या गावकऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा घेतलेला निर्णय अखेर स्थगित केला आहे. प्रशासनाच्या दबावामुळे ही निवडणूक प्रक्रिया थांबवल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी द
.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी EVM मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला होता, त्यानुसार त्यांनी EVM ची सत्यता पडताळून पाहण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव पारित केला होता. तसेच ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे निवेदन तहसीलदारांकडे सादर केले होते. पण प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळली. त्यानंतर ग्रामस्थांनी आज होणारी मतदान प्रक्रिया स्थगित केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनाक्रमावरून सरकारवर तीव्र आगपाखड केली आहे.
लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याला सुरुवात
नाना पटोले आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की, मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम! विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका आहे. आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी सोलापूरच्या मारकडवाडी ग्रामस्थांनी आज (मंगळवार, ३ डिसेंबर) मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. पण प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करून, पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखले. मारकडवाडीमध्ये प्रशासन ब्रिटिशांप्रमाणे वागत आहे. त्यामुळे ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर प्रशासन एका छोट्या खेड्यात मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला का घाबरत आहे? आपले बिंग फुटेल म्हणून? ईव्हीएमवरचे मतदान निर्दोष आहे, त्यात काही घोटाळा नाही हे जनतेला पटवून देण्याची संधी प्रशासनाने भाजपच्या दबावामुळे गमावली आहे. त्याचवेळी मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली. काँग्रेस पक्ष या लढाईत ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन लोकशाहीचा विजय होईल. डरो मत!, असे पटोले म्हणाले.
उत्तम जानकर काय म्हणाले?
आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले की, प्रशासनाने मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यास विरोध केला. तसेच या प्रकरणी कारवाई करण्याचाही इशारा दिला. त्यानंतर मी यासंबंधीग्रामस्थांशी चर्चा केली. गावकऱ्यांचे म्हणणे आहे, की मतदानच करु देणार नसतील तर निवडणूक कशी घेणार. आपण पेट्या धरुन ठेवणार आणि ते हिसकावणार, यात गोंधळ उडेल, झटापट होईल आणि लोक निघून जातील. गावकऱ्यांना मतदान करु द्यायचे नाही आणि साहित्य घेऊन जायचे हा पोलिसांचा प्लॅन आहे. त्यामुळे गावकऱ्यांसोबत चर्चा करुन आम्ही ही प्रक्रिया थांबण्याचा निर्णय घेतला आहे.