एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर कदाचित संध्याकाळी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक होऊ शकते, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितले. महायुती सरकारचा 5 डिसेंबर रोजी सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज म
.
काय म्हणाले संजय शिरसाट? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे कालच्या सर्व बैठका रद्द झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन केले आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील ही बैठक झाल्यानंतर कदाचित आज संध्याकाळी महायुतीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होणार असल्याचे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितले.
शिरसाटांचा संजय राऊतांना सल्ला
कोण काय बोलले यावर भाष्य केले जाणार नाही. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल, असे संजय शिरसाट म्हणाले. तर अंजल दमानिया यांच्या दाव्यावर भाष्य करणे संजय शिरसाट यांनी टाळले. कोण अंजली दमानिया? काहीही बोलणाऱ्या प्रत्येकाला आम्ही महत्व देत नाहीत, असे ते म्हणाले. पुढे बोलताना शिरसाट यांनी संजय राऊत यांना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे. राऊत यांनी आता फक्त शांत रहावे. लोकांना कंटाळा येईल, इतके बोलू नका, असे शिरसाट म्हणाले.

महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधीच्या तयारीचा आढावा मुंबईतील आझाद मैदानावरील शपथविधीच्या तयारीचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारांकडून आढावा घेण्यात आला. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयात भाजपची जय्यत तयारी सुरू आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी एनडीए शासित राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी, साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रित केले जाणार आहे.

4 डिसेंबरला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. महायुती म्हणजेच भाजप-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी पवार यांना 230 जागांचे प्रचंड बहुमत मिळाले. मात्र 10 दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय झालेला नाही. तर भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे होणार आहे.
