एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये सहभागी होणार नाही: सचिन खरात यांचा निशाणा – Mumbai News



एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केले आहे. तर दुसरीकडे अंजली दमानिया यांचे एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसणार? असे ट्विट केल्याने आता राजकीय

.

शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहिणमुळेच महायुतीला यश

सचिन खरात म्हणाले की, महाराष्ट्र राज्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना चालू केल्यानेच महायुतीला यश मिळाल्याची चर्चा राज्यामध्ये आहे. निकालाला इतके दिवस होऊन सुद्धा आजतागायत महायुतीचे सरकार स्थापन झालेले नाही.महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

नेमके सचिन खरात यांचे वक्तव्य काय?

सचिन खरात म्हणाले की, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे त्यांचे प्रवक्ते बोलत आहेत. म्हणूनच आमचे मत आहे की, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही असे खरात यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसणार?

एकनाथ शिंदे सरकारला बाहेरुन पाठिंबा देतील अशी देखील चर्चा सुरु होती. यातच आता एकनाथ शिंदे विरोधी पक्षात असतील अशी चर्चा सुरु आहे. अंजली दमानिया यांच्या एका ट्वीटमुळे ही चर्चा सुरु झाली आहे. विरोधी पक्षात असलेल्या मविआला विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळेल एवढ्याही जागा मिळालेल्या नाहीत. यामुळे शिंदेना मुख्यमंत्री पद नाही तर मग विरोधी पक्ष नेतेपद देऊन सरकारही आपलेच, विरोधी पक्षनेताही आपलाच अशी रणनिती भाजपा आखत असल्याचा अंदाज दमानिया यांनी केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24