राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळगावी गेले होते. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते विश्रांतीसाठी गावी गेल्याचे त्यांनी सांगितले होते. यावरुन मनसे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्
.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने प्रचंड बहुमत दिले. निकाल लागून 9 दिवस झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदे तब्येतीचे कारण देऊन गावी गेल्यामुळे राजू पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे.
ईव्हीएमच्या मुद्द्यावरून लक्ष हटविण्यासाठी प्रकार सुरू? राजू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले. सध्या राज्यात ईव्हीएम बद्दल जी ओरड सुरू आहे. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा संशय येत असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी काहीही केले, तरी शेवटी यांना बीजेपी सांगेल तेच करायचे आहे, अशी खोचक टीकाही राजू पाटील यांन एकनाथ शिंदेंवर केली.
वाढलेले सगळेच मतदान विरोधकांनाच मिळाले का? दरम्यान, विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालाचा मी स्वीकार केला आहे. राज्यात ज्या गोष्टी घडत आहेत. निकालानंतर ईव्हीएमबाबत बोंबाबोंब सुरू आहे. आमच्या पक्षाने आणि राज ठाकरे यांनी 2018 मध्येच ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू केली होती. या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत. आता माझ्याच मतदारसंघाबाबत बोलायचे झाल्यास, येथे 65 हजार मतदार वाढले आहेत आणि प्रतिस्पर्धी उमेदवार 66 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. म्हणजे वाढलेल्या 65 हजारांपेक्षा 1 हजार जास्त मते विरोधी उमेदवाराला कशी मिळाली, असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच व्हीव्हीपॅट मशीनमधील मते मोजण्याकरीता आठ लाख रुपये भरल्याचेही त्यांनी सांगितले.