भाजपच्या विधीमंडळ गटनेता निवडीसाठी 4 डिसेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. त्यासाठी भाजपने निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून निवड केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या निवडीचे पत्र जारी केले आहे. पक्षाचे निरीक्षक उद्
.
भाजपकडून निरीक्षक कधी नेमले जाणार, अशी सर्वांना प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. त्यामुळे विधीमंडळ गटनेत्याची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे. 4 तारखेला होणाऱ्या बैठकीसाठी भाजप नेत्यांना मुंबईत बोलावले जाईल.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस झाले आहेत, मात्र भाजपकडून अद्यापही विधीमंडळ गटनेत्याची निवड झाली नाही. गटनेता निवडीसाठी भाजपकडून निरीक्ष नेमले जाणार होते. पण ते कधी नेमणार याची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून निरीक्षक म्हणून निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे विधीमंडळ गटनेत्याची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे. 4 तारखेला होणाऱ्या बैठकीसाठी भाजप नेत्यांना मुंबईत बोलावले जाईल.
4 डिसेंबर पर्यंत पूर्ण प्रक्रिया करणे आवश्यक
निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. तर विजय रुपाणी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री राहिले आहे. दोघेही उद्या महाराष्ट्रात येणार असून त्यानंतर विधीमंडळ गटनेता निवडीसाठी बैठक घेणार आहेत. या बैठकीतून सर्वानुमते भाजपच्या विधीमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे. दरम्यान, 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे गटनेता निवड किंवा राज्यपालकांकडे सरकार स्थापनेचा दावा या सर्व प्रक्रिया 4 डिसेंबर पर्यंत करावा लागणार आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचे नाव निश्चित
भाजपवर तिसऱ्यांदा आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख बदलण्याची वेळ आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता ही 4 डिसेंबरला बैठक होईल. यापूर्वी ही बैठक 29 नोव्हेंबर रोजी होणार होती. पण ती ऐनवेळी 1 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. त्यानंतर ती 3 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता ती 4 तारखेला होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित केले आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.