मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्याबदल्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार असून त्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा रंगली होती. यावर खुद्द श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या उपमु
.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.
मी कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय पदाबाबतही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या देतांना वास्तवाकडे पाठ फिरवू नये
माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा आहे, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांचे कान टोचले.
हे ही वाचा…
अजित पवार आज पुन्हा दिल्लीला जाणार:अमित शहा यांची घेणार भेट; एकनाथ शिंदेंच्या कथित नाराजीच्या पार्श्वभूमीवर होणार भेट

महायुतीचा सरकार स्थापन करण्याचा तिढा अद्याप सुटला नाही. भाजपने सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरचा मुहूर्त काढला आहे. पण महायुतीला या सरकारचे नेतृत्व कोण करणार? याविषयीची उत्कंठा अद्याप संपली नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज तातडीने दिल्लीला जाणार आहेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे भाजप एकनाथ शिंदेंच्या नाराजीकडे कानाडोळा करून महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सविस्तर वाचा…