महायुतीत मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग: शिवसेनेचे आमदार मुंबईत तळ ठोकून; एकनाथ शिंदेंना म्हणावे लागले – मतदारसंघात जाऊन काम करा – Mumbai News



महायुतीचा सरकार स्थापन करण्याचा तिढा अद्याप सुटला नाही. पण त्यानंतरही नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रचंड चढाओढ लागली आहे. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या अनेक आमदारांनी मुंबईत तळ ठोकला आहे. हे नेते मुंबईत राहून मंत्रीपदासाठी लॉबि

.

महायुतीच्या नव्या सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक आमदारांनी मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्रीपद उपभोगणारे आमदार आपले मंत्रीपद शाबूत राखण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अन्य आमदार आपली मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी या सर्वांनी मुंबईत डेरा टाकला आहे. त्यातच नव्या सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कमी मंत्रीपदे येण्याची शक्यता असल्यामुळे मंत्रीपदासाठी आसुसलेल्या आमदारांची आपापल्या नेत्यांपुढे मोठी गर्दी होत आहे.

विशेषतः शिवसेना आमदार संजय शिरसाट व भरत गोगावले यांना मागील सरकारमध्ये कोणतेही मंत्रीपद मिळाले नव्हते. ते शेवटपर्यंत मंत्रीपदाच्या शर्यतीत होते अखेर शिरसाट यांना सिडको, तर गोगावले यांना एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर आता पुन्हा या दोघांनी आपल्या नेतृत्वाकडे मंत्रीपदासाठी आग्रह धरला आहे.

शिंदेंचा आमदारांना मतदारसंघात जाण्याचा सल्ला

आपल्या आमदारांच्या या आग्रहामुळे एकनाथ शिंदे चांगलेच कोंडीत सापडलेत. त्यामुीळे त्यांनी आपल्या सर्वच आमदारांना मुंबईत थांबण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघात जाऊन काम सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेचे बहुतांश आमदार मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये थांबले आहेत. आता शिंदे यांच्या सूचनेनुसार तेथील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा…

भाजप स्वतः बहुमताच्या जादुई आकड्याजवळ:राष्ट्रवादीची शर्यतीतून माघार, मग महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे घोडे नेमके अडले कुठे?

मुंबई – महाराष्ट्रात कुणाच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपला एकट्याला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्यात. विशेषतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यानंतरही महायुतीने आपला नवा कारभारी घोषित केला नाही. सूत्रांच्या मते, भाजप नेतृत्वाला जातीय समीकरणापासून एनडीएच्या सर्वच सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. यामुळेच गत 4 दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

एकीकडे मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस चर्चेत आहेत. भाजपपुढे ओबीसी समुदायाचे मतही विचारात घ्यावे लागणार आहे. चला तर मग पाहूया महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे घोडे नेमके कुठे अडले? वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24