महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिमाखदार कामगिरी केली आहे. शिवसेनेने 57 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर शिंदे गटातील शिवसेनेचे सर्वच्या सर्व आमदार वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये राहणार आहेत. शपथविधीपर्यंत सर्
.
दरम्यान, काल झालेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाने सरकार स्थापनेबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत मित्रपक्षांशी चर्चा करण्याचे पूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
विधानसभा निवडणुकीत 57 जागा जिंकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्साहात आहेत. त्यामुळेच ते सध्या मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडायला तयार नाहीत. या कारणामुळे भाजपच्या कोअर ग्रुपमधील नेते आणि शिंदे गटाच्या कोअर कमिटीतील नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवा, असे शिंदे गटाचे नेते सांगत आहेत. ‘महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार?’ हा निर्णय आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीत घेणार आहेत, असे शिंदे गटाच्या नेत्यांचे मत आहे.
हे ही वाचा…
जनतेच्या न्यायालयातही न्याय विकत घेतला:मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुजरातची निवड करावी, संजय राऊतांचा हल्लाबोल

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वेळीच आमदार अपात्रतेचा योग्य निर्णय दिला असता, तर आज महाराष्ट्रातील चित्र वेगळे असते. कालचा निकाल आधीच ठरवला होता. फक्त मतदान होऊ दिले, अशी टीका संजय राऊत यांनी केली. हे सरकार गुजरात लॉबीला हवे होते, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी गुजरातला जावे, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला आहे. पूर्ण बातमी वाचा…
आजचे एक्सप्लेनर:’बंटेंगे तो कटेंगे’ घोषणा, मोफत योजनांची आश्वासने; निकालांच्या नॅशनल इम्पॅक्टविषयी जाणून घ्या सर्वकाही

महाराष्ट्रात भाजप आघाडीने म्हणजेच महायुतीने 234 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये एकट्या भाजपच्या 132 जागा आहेत. भाजपचा स्ट्राइक रेट 88% पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात भाजपचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. मात्र, झारखंडमध्ये भाजप सत्तेपासून खूप मागे पडला आहे. येथे JMM-काँग्रेस आघाडीने एकतर्फी 56 जागा जिंकल्या आहेत. पूर्ण बातमी वाचा…