प्रकाश आंबेडकरांना एकही जागा मिळते का ते पाहू आणि मग वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचे का नाही हा निर्णय घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हणत प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला आहे. तर काही वेळा पूर्वी सत्ता स्थापन करू शकणा
.
दरम्यान महेश तपासे म्हणाले की, आमच्या विचाराशी सहमत असलेल्या इतर पक्षांसोबत आम्ही पुढे जाऊ. आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत, आम्ही 26 तारखेला आमचे सरकार स्थापन करू. आम्हाला पूर्ण विश्वास आहे.कारण हे सत्ताविरोधी मतदान आहे. सरकार कसे बनवायचे यावर चर्चा करत होतो. आम्ही उमेदवारांना मतमोजणी केंद्रावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, दिल्लीतून फोन आल्यास आम्ही तिथेही उपस्थित राहू.
संख्याबळ मिळाले, तर सत्ता स्थापन करू शकणाऱ्या सोबत राहणार – आंबेडकर
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले की, जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.
शनिवारी(दि.23) राज्यात मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल उद्या स्पष्ट होणार आहे. वंचित बहुजन आघाडी या वेळी अनेक ठिकाणी जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ॲड.आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सत्तेत जाणार असे म्हटले आहे.