आंबेडकरांचे 50-60 आमदार निवडून येत असतील तर….: संजय राऊतांचा टोला; बहुमत असूनही भाजप सत्ता स्थापनेत अडथळा निर्माण करण्याची भीतीही केली व्यक्त – Mumbai News



राज्यामध्ये महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काल आम्ही प्रत्येक मतदारसंघ निहाय आढावा घेतला. त्यानुसार आम्ही किमान 160 जागा जिंकत असल्याचे लक्ष्यात आले, असे देखील संजय राऊत यांनी म्

.

ज्या ठिकाणी सत्ता असेल त्या ठिकाणी इतर छोटे मोठे पक्ष एकत्र येत असतात. आमच्या सोबत समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत. काही अपक्ष उमेदवारांनी देखील आम्हाला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सत्ता स्थापन करत असताना आपण सत्तेत सहभागी व्हावे, असे छोट्या पक्षाची इच्छा असते. त्यामुळे सर्वांना सोबत घेणार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला.

आतापासूनच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उमेदवारांना 50 – 50, 100-100 कोटी रुपयांची ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना जिंकण्याची खात्री नाही. ज्यांना जिंकण्याची खात्री नसते तेच पैसे द्यायला तयार होतात, असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. त्यांना विजयाची अपेक्षा नसती तर त्यांनी पैशांच्या थैल्या पाठवल्या नसत्या, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.

मतदानाच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह

मतदानाच्या आकडेवारी मध्ये अचानकपणे वाढ होते. हरियाणामध्ये देखील तसेच झाले होते. त्यामुळे हा काय खेळ आहे? हे निवडणूक आयोगाने आम्हाला समजून सांगायला हवे. अचानक दोन-चार टक्के मतदान कसे वाढते? आणि अचानकपणे भारतीय जनता पक्षाच्या जागा कशा वाढतात? हे आम्हाला निवडणूक आयोगात बसलेल्यांनी समजून सांगावे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बहिणी केवळ त्यांच्याच लाडक्या आहेत का?

मतदानातील महिलांचा टक्का वाढला असेल तर ती चांगली गोष्ट आहे. त्याचे महाविकास आघाडी स्वागतच करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणींने आम्हाला मतदान केले असल्याचा दाव्यावर राऊत यांनी टीका केली. लाडक्या बहिणींनी केवळ तुम्हालाच मतदान केले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जेवढे स्वातंत्र्य गौतम अदानी यांना गुन्हे करून सुटण्याचे आहे. तसेच बोलण्याचे आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य सर्वांना असल्याचे संजय राऊत यांनी म्हटल आहे. पंधराशे रुपये देऊन आम्हाला कोणीही विकत घेऊ शकत नाही, असे महिलांना वाटले असेल. त्यामुळेच या गुलामीविरुद्ध महिलांनी बंड करून जास्त मतदान केले असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांना टोला

प्रकाश आंबेडकर हे लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे जर 50 – 60 आमदार निवडून येत असतील आणि आम्हाला 50 – 60 आमदारांची गरज लागली, तर आम्ही नक्कीच त्यांची मदत घेऊ, असे म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना देखील टोला लगावला. लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी आमच्या सोबत राहावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. विधानसभा निवडणुकीत देखील आम्ही प्रयत्न केला. आता त्यांचेच म्हणणे आहे की ज्यांची सत्ता येईल त्यांच्यासोबत ते राहणार आहेत. आता राज्यात आमची सत्ता येत आहे. त्यामुळे ते आमच्या सोबत राहतील, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बहुमत असूनही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न होईल

सरकार बनवण्यासाठी अत्यंत कमी वेळ देण्यात आला आहे. हा भारतीय जनता पक्षाचा एक डाव असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे आमदार एकत्र येतील, त्यानंतर तिन्ही पक्षाचा विधिमंडळातील नेता निवडला जाईल आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. मात्र केंद्रीय गृहमंत्रालय हे भारतीय जनता पक्षाचे कार्यालय असल्यामुळे ते बहुमत असून देखील आम्हाला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला. मात्र आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नसल्याचा दावा देखील त्यांनी केला.

आमदारांना एकत्र आणणार

आमच्या निवडून आलेल्या सर्व आमदारांना एकत्र मुंबईत आणणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील आमदारांची मुंबईत राहण्याची व्यवस्था नाही. गडचिरोली पासून चंद्रपूर पर्यंत. अनेक नवीन आमदार निवडून येत आहेत. ते मुंबईत राहणार कोठे? त्यामुळे आम्ही त्यांची निवास व्यवस्था एकत्र करावी, असा एक निर्णय आमचा झाला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

जयंत पाटील उत्तम राज्य चालवू शकतात

आमची महाविकास आघाडी ही एकत्रच प्रवास करत आहे. मागील तीन वर्षापासून आमचा एकत्र प्रवास सुरू आहे. महाविकास आघाडी सोबतच सत्तेवर येत आहे. या आघाडीच्या गाडीत बसणारा प्रत्येक व्यक्ती उत्तम चालक आहे. या गाडीमध्ये आणखी कोणी बसणार आहेत का? हे उद्या कळेल. जयंत पाटील यांना उत्तम वाहन चालवता येते, असा मला अनुभव असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात. महाविकास आघाडीमध्ये अशी अनेक नेते आहेत ते उत्तम राज्य चालवू शकतात. उद्धव ठाकरे यांना देखील सरकार चालवण्याचा अनुभव नव्हता. मात्र त्यांनी अतिशय उत्तम रित्या सरकार चालवून दाखवले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार स्थापन करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नाना पटोलेंना प्रत्युत्तर

नाना पटोले हे मुख्यमंत्री पदाबाबत काय म्हणतात, ते मला माहिती नाही. मात्र आम्ही सरकार स्थापन करत आहोत. सरकार स्थापनेबाबत आमच्यामध्ये चर्चा झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झाली असल्याचा दावा मी केला नाही. आमच्यात केवळ सत्ता स्थापन करण्याबाबतची चर्चा झाली आहे. हेच मी सांगितले असल्याचे म्हणत त्यांनी पटोलेंना देखील प्रत्युत्तर दिले आहे.

सोलापूर बाबत बोलणे टाळले

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जागा ही अधिकृतपणे महाविकास आघाडीतील शिवसेनेला सुटली होती. त्या ठिकाणी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी शिवसेनेचे काम करणे अपेक्षित होते. मात्र, सोलापूर दक्षिण मध्ये काय झाले याची मला कल्पना नाही. सुशीलकुमार शिंदे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने का घडले? त्याच्या मागची कारणे काय? हे आम्हाला तपासून पहायला लागेल. त्यांच्यावर लोक का संतापले आहेत? लोक का चिडले? याबाबत आम्हाला माहिती घ्यावी लागेल. त्याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24