मला तुरुंगात कित्येकदा उपाशी झोपावे लागले: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा आत्मचरित्रात दावा, फडणवीसांची गलेलठ्ठ उंदराशी तुलना – Mumbai News



माजी गृहमंत्री तथा शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी रविवारी सकाळी त्यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आत्मचरित्रातील दोन उतारे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यामध्ये त्यांनी तुरुंगात आलेला अनुभव तसेच एका टरबुज्या नावाच्या गल्लेलठ्ठ उंदराची गोष

.

अनिल देशमुख यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या – लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय! माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील 16 आणि 20 नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत.

…तर माझ्या जेवणाच्या ताटावर उंदीर-चिंचुंद्र्या तुटून पडायच्या

तुरुंगात अनेकांना घरचे जेवण दिले जात असे. मात्र मला घरचे जेवण द्यायला न्यायालयाची परवानगी नव्हती, म्हणून मला तुरुंगातील जेवणच दिले जायचे. तुरुंगातील जेवण कसे असते याचा अंदाज वाचक लावू शकतात; मात्र, त्यापेक्षाही तुरुंगातील जेवण कितपत सुरक्षित आहे, याची सतत धाकधूक असायची. संपूर्ण तुरुंगात आणि माझ्याही सेलमध्ये उंदीर-चिचुंद्रयांची अगदी भाऊगर्दीच होती. कित्येकदा तर असे व्हायचे की जेवण यायचे आणि मला जेवायला थोडा जरी उशीर झाला, तर तोवर उंदीर-चिचुंद्रया त्यावर तुटून पडलेल्या असायच्या. यामुळे कित्येकदा माझ्यावर उपाशी झोपण्याची पाळीही आली. रविवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी तर जेवणाची परिस्थिती आणखीच खराब असायची; कारण रविवारी दुपारी 12 वाजता सेलचे दरवाजे जे बंद व्हायचे, ते थेट दुसऱ्या दिवशी 12 वाजता उघडायचे. म्हणजेच रविवारी दुपारी 12 वाजता जे जेवण मिळायचे त्यावरच दुसऱ्या दिवशी जेवण मिळेपर्यंतची वेळ मारून न्यावी लागायची. त्याशिवाय रविवारी दुपारी आलेले जेवण उरवून उंदीर-चिचुंद्रयांपासून त्याचे रक्षण करण्यासाठी ते बादलीच्या वर ठेवून त्याची राखण करत बसावे लागायचे ते वेगळेच, असा अनुभव अनिल देशमुख यांनी पुस्तकात पान क्रमांक 180 वर सांगितला आहे.

टरबूजा नावाचा गल्लेलठ्ठ उंदीर अनिल देशमुख यांनी पुढे टरबूजा हा उल्लेख केला आहे. ते लिहितात की, तुरुंगात तसे तर खूपच उंदीर आणि चिचुंद्र्या होत्या. त्यामध्ये एक उंदीर वेगळा होता. अगदी गलेलठ्ठ. साहजिकच तुरुंगातले सगळे त्याला टरबूजा म्हणायचे. त्याला कितीही दूर हाकलायचा प्रयत्न केला तरीही तो अशा काही नजरेने बघायचा की जणू काही ती नजर सांगत असायची मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन..! असे देशमुख यांनी नमूद केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24