मुंबईत फेरीवाल्यांची मुजोरी आणि दादागिरी वाढत असल्याचे वारंवार समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईची माजी महापौर दत्ता दळवी यांनाही फेरीवाल्यांच्या दादागिरीला सामोरे जावे लागले. विक्रोळी येथे दत्ता दळवी यांना फेरीवाल्यांनी धक्काबुक्की आण
.
नेमके काय घडले? दत्ता दळवी हे सकाळी व्यायाम करुन विक्रोळीतील शिवसेना शाखेजवळ गेले होते. या ठिकाणी काही फेरीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करत दुकाने थाटली होती. दत्ता दळवी यांनी रस्त्यात येत असलेले प्लास्टिकचे कॅरेट बाजूला हटवले. यामुळे फेरीवाल्यांनी त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे.
दत्ता दळवी काय म्हणाले? या घटनेनंतर दत्ता दळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी या भागाचे 10 वर्षे प्रतिनिधित्व केले होते. परंतु, एकाही फेरीवाल्याची रस्त्यावर बसायची हिंमत नव्हती. 42 ते 45 फुटाचे रस्ते आहेत. पण लोकांना 10 फूटाचे रस्ते देखील चालायला मिळत नाहीत. मी सातत्याने त्यांना म्हणत असतो, तुम्ही तुमच्या जागेवर बसा, लोकांचा अधिकार तुम्ही हिसावून घेऊ नका. त्यादिवशी सकाळी मी व्यायाम करुन येत असताना त्या दुकानासमोर गेलो. भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केलेले होते. मी एका भाजीचे क्रेट हटवले. त्यानंतर तो विक्रेता माझ्या अंगावर धावून आला. लोकांना त्रास होतोय आणि त्याविरोधामध्ये मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी एकटा होतो आणि फेरीवाल्यांना त्या पुरून उरेन एवढी ताकत सुद्धा आमच्याकडे आहे, परंतु ज्यांचे हे काम आहे त्यांनी करणे आवश्यक आहे, असे दत्ता दळवी यांनी एका ‘वृत्तवाहिनाी’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा…
छत्रपतींचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई:या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला मिर्झापूरमधून अटक; 3 दिवसांची पोलिस कोठडी
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणाची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती. या प्रकरणानंतर राज्य सरकारच्या वतीने गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. परमेश्वर यादव असे या आरोपीचे नाव असून यादव याने या पुतळ्याचे वेल्डिंग नीट केले नसल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश मधील मिर्जापुर येथून यादव याला अटक करण्यात आली आहे. आता त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…