महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले प्रसिद्ध IRS अधिकारी समीर वानखेडे राजकारणात उतरणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष
.
आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…
राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा….
भाजपच्या प्रचारासाठी संविधानाचा चुकीचा वापर:न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यावरून संजय राऊत बरसले; हातात तलवार ऐवजी संविधान दिल्यावरूनही टीका

लोकसभा निवडणुकीत भारतातील जनतेने मोदींचे बहुमत काढून टाकले. त्यावेळी संविधान वाचवण्याचा लढा आम्ही दिला होता. त्यामुळेच आता न्यायालयातील काहींनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीत काढून टाकली असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता न्यायदेवता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहणार आहे, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढून संविधान देण्यात आले आहे. हा भाजपचा प्रचार असून आएसएसचा अजेंडा असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…
लाडकी बहीण योजना हलक्यात घेऊ नका:सरकार आल्यास दीड ऐवजी 3 हजार देऊ असे सांगा; श्याम मानव यांचा आघाडीच्या नेत्यांना सल्ला

विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हलक्यात घेऊ नका, या योजने विरोधात न बोलता महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिलांना दीड हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये देऊ, असे सांगा, असा सल्ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…
मतदारांना विकत घेण्याचा युतीचा प्रयोग:तर न्यायालये देखील कोणाची तरी ‘जी हुजुरी’च करत आहेत; उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल

पुढील महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील व त्या सध्याच्या भ्रष्ट तसेच घटनाबाहय़ सरकारविरुद्ध ईर्षेने लढवल्या जातील. महाराष्ट्र राज्याची इभ्रत ईरेला लागली आहे व मऱ्हाठी जनता पेटून उठली आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर घडविण्यासाठीच या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली. दिल्लीवाल्यांची सोय पाहूनच आता निवडणुकांच्या तारखा घोषित होतात. तशा त्या महाराष्ट्रातही झाल्या. युद्धाचे रणशिंग फुंकले गेले आहे. महाराष्ट्रासाठी हा लढा जिंकू किंवा मरू असाच आहे, पण हरण्याचे नावच नको. लढू आणि जिंकू. जिंकावेच लागेल! असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…