राज्यातील महाविकास आघाडीतील नेते गुजरात राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सध्या देशात महाराष्ट्र नंबर एकचे राज्य असून देखील महाविकास आघाडीचे नेते गुजरातचे गुणगान गात आहेत. या माध्यमातून ते महाराष्ट्र
.
राज्यातील स्थगिती सरकार गेल्यानंतर आता राज्यात गतिशील सरकार आले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आमच्यासाठी निवडणुकीचा शंखानाद झाला आहे. मात्र विरोधकांसाठी ते ऐलान असल्याचा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे. आम्ही परिवर्तन करणाऱ्या योजना आणल्या असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय
शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेची योजना आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज उपलब्ध करून देणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. ही केवळ घोषणा नाही. तर याचे प्रत्यक्ष काम जमिनीवर सुरू केले असल्याचे देखील ते म्हणाले. साडेआठ रुपयांना पडणारी वीज आता तीन रुपयाला पडणार असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. यातून राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणात पैसा देखील वाचणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
गृहमंत्रालयावरील आरोपावर प्रत्युत्तर
राज्यातील कायदा व्यवस्थे संदर्भात देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारने कोणतेही घटना घडल्यानंतर तात्काळ कारवाई केली असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. मात्र, ज्यांचे गृहमंत्री स्वतः जेलमध्ये गेले. ते आता राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलत असल्याचा खोचक टोला देखील त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या म्हणजेच उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घडलेल्या अनेक गुन्हेगारी संदर्भातील घटनांचा उल्लेख केला. आता देखील काही घटना घडल्या आहेत. मात्र तात्काळ कारवाई केली गेली असल्याचा दावा त्यांनी केला.
या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा….
निवडणूक जाहीर होताच महायुती मैदानात:मुख्यमंत्री शिंदे राहुल गांधी, उद्धव ठाकरेंवर बरसले; फडणवीस- अजित पवारांचींही टोलेबाजी

अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महायुतीकडून प्रकाशित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीने एकत्रित पत्रकार परिषद घेत आपले रिपोर्ट कार्ड सादर केले. हे दोन पानांचे रिपोर्ट कार्ड असून या माध्यमातून केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा सादर करत असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले. पूर्ण बातमी वाचा…