गेल्या चार वर्षांपासून अडगळीत पडलेला राज्यपाल नियुक्त 12 जागांचा मुद्दा विधासभा निवडणुकीच्या तोंडावर मार्गी लावण्याचा सरकार प्रयत्न आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 7 जणांच्या नावाची यादी मांडण्यात आली. ही यादाी राज्यपाल
.
राज्यपालांना 12 जणांना विधान परिषदेवर निवड करता येते. महायुतीमधी प्रमुख पक्षांनी 6-3-3 असा फॉर्म्युला निश्चित केल्याचे म्हटले जात होते. पण सध्या 7 जणांच्या नावाची यादी पाठवण्यात आली आहे. यामध्ये भाजप 3, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 असा फॉर्म्युला वापरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके आणि पंकज भुजबळ यांची वर्णी लागली आहे. तर भाजप आणि शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार, हे पहावे लागणार आहे.
कोण आहेत पंकज भुजबळ ? पंकज भुजबळ हे 2009 आणि 2014 मध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगावमधून विधानसभेवर गेले होते. 2019 मध्ये मात्र त्यांना हॅट्रीक साधता आली नाही. शिवसेनेचे सुहास कांदे यांनी त्यांचा पराभव केला होता. यंदाच्या विधानसभेला पंकज भुजबळ यांची नांदगावमधून लढण्यास इच्छुक आहेत. पण ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे भुजबळ यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात येणार आहे.
कोण आहेत संजय खोडके? संजय खोडके हे अमरावतीचे असून त्यांच्या पत्नी सुलभा खोडके काँग्रेसच्या आमदार आहेत. संजय खोडके अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. विधान परिषदेच्या निवडणुकीत सुलभा खोडके यांनी क्रॉस वोटिंग केल्याचे म्हटले जात आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे काँग्रेसने त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले. त्यामुळे त्या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. जून 2020 मध्ये तत्कालीन राज्यपालांनी केली नव्हती नियुक्ती महाविकास आघाडीने जून 2020 मध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही नियुक्त्या दिल्या नाही. कोश्यारी मुद्दामहून अडवणूक करत आहेत, असा आरोप करत कोल्हापूर येथील सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्यात जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सत्ता परिवर्तन झाले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार आले. त्यामुळे आधीच्या आमदारांची यादी बारगळली. आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा मुद्दा धसास लावण्याचा प्रयत्न करण्यात येत असून महायुतीच्या वतीने 7 जणांच्या नावाची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे.