सीएम एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा: मुंबईतील 5 टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोल माफी, रात्री 12 वाजल्यापासून अंमलबजावणी – Mumbai News



विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. हलक्या मोटर वाहनांना ही टोल माफी असून आज रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजाव

.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित होऊ शकते. त्यामुळे मंत्रिमंडळाची शेवटची बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या टोलमाफीची अखेर घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. आनंदनगर, दहिसर, मॉडेला, वाशी, ऐरोली या टोल नाक्यांवर टोलमाफी करण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही.

सरकारकडून लोकप्रिय निर्णयांचा धडाका आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती सरकारच्या वतीने निर्णयांचा धडाका लावला आहे. मागील आठवड्यात दोन-दोन मंत्रिमंडळ बैठका पहायला मिळाल्या. समाजातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक लोकप्रिय निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील होमगार्ड्सचे मानधनात दुपटीने वाढ केली आहे. राज्यातील अनेक आयटीआय संस्थांची नावे बदलून त्यांना महापुरुषांची नावे दिली आहेत. मदरशांमध्ये शिकवणाऱ्या शिकक्षांचे मानधनातही दुपटीने वाढ केली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामांतर केले आहे. विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आधीच लांबणीवर पडलेली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका कधी जाहीर होणार आणि आचारंसहिता कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पुढील दोन दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मंत्रालयात आज सकाळीच मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्याआधी निवडणुका होतील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. महाराष्ट्रात 288 जागांवर दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24