लडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या योजनेचा चौथा हप्ता देखील मिळणार नसल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सध्या सरकारचे ओव्हर ड्राफवर पैसे देणे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारी कर्मच
.
राज्यभरातील ठेकेदारांचे आज आंदोलन होत आहे. त्यांच्याकडून काम करून घेण्यात आली. मात्र त्यांचे पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. ठेकेदारांना बिल द्यायला देखील सरकारकडे पैसे नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेससाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात. मात्र, लाडक्या बहिणी येत नसल्याचे ते म्हणाले. मोदींच्या सभेत बहिणींच्या खुर्चा रिकाम्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लाडक्या बहिणींच्या घोषणा करण्याआधी मध्य प्रदेश मध्ये या योजनेचे हाल पहा, असे आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले. मध्य प्रदेश मधील सरकारने जाहीर केलेली लाडकी बहिणी योजना बंद पडली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हर्षवर्धन पाटलाचा प्रवेश शुभशकुन
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. दीपेश म्हात्रे हे पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये आले आहेत. जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक या भागातून देखील मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये इनकमिंग होणार आहे. हे सर्व लोक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे काम करतील आणि आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे. हर्षवर्धन पाटील यांचे महाविकास आघाडीत प्रवेशाचे आम्ही स्वागत करतो. हर्षवर्धन पाटील ही तर केवळ सुरुवात आहे. मात्र ज्या दिवशी महाराष्ट्रात आचारसंहिता लागेल त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येणाऱ्या नेत्यांचा प्रवाह वाढलेला दिसून येईल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन पाटलांचा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश हा आमच्यासाठी शुभशकुन असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री 40% तर चिरंजीव 20%
मोदी आणि शहा ही शिंदेंची कवच कुंडले आहेत. त्यामुळे आज सत्ताधाऱ्यांचा आवाज दिसून येत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र ज्या दिवशी मोदी आणि शहा यांची कवच कुंडल बाजूला जातील त्या दिवशी आम्ही ताकद दाखवून देऊ, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आधी स्वतःचे चिरंजीवांचे कारनामे पाहावे, असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री 40% तर त्यांचे चिरंजीव 20% असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यातून धमकवण्याचे काम त्यांचे चिरंजीव करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…
‘परिणाम वाईट होतील’:नागपूर पोलिसांना धमकावल्याप्रकरणी भाजप नेत्यावर गुन्हा दाखल; गृहमंत्र्यांचा जिल्हा असल्याने चर्चा

नागपूर पोलिसांनी भाजप नेते आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. भाजप नेत्यावर पोलिसांना धमकावून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील या प्रकरणामुळे आता याची चर्चा चांगलीच रंगली आहे. पूर्ण बातमी वाचा…
संभाजीनगरात ‘बुद्धलेणी बचाव’साठी आज निघणार मोर्चा, शाळांना सुटी जाहीर:क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर 4 तास आंदोलन

बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या वास्तूचे बांधकाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाही. तरीसुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचे सांगत नोटीस दिली. हा प्रकार सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १२ धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी निर्देश दिले. परंतु नोटिसीमुळे भावना दुखावल्याने भिक्खू संघ, उपासक व आंबेडकरी समुदायातर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात येईल, अशी माहिती समन्वयक गौतम खरात यांनी दिली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील शाळांना सोमवारी सुटी जाहीर केली आहे. पूर्ण बातमी वाचा…