हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशामुळे शरद पवारांची डोकेदुखी वाढली: पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त, वेगळा निर्णय घेण्याचा इशारा


भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र यामुळे आता शरद पवार यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नाराजी पसर

.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयात उमेदवारांना संधी देऊ नका, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे या आधी देखील केली होती. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी केलेल्या या मागणीमुळे त्यांना विरोध होत असल्याची संकेत मिळाले होते. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी अखेर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता हे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे. या कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकारणाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

तिकिटाचा निर्णय शरद पवारांचा

मी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. तसेच मी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, या बाबतचा निर्णय शरद पवार घेणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात आपली शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते तुतारी या चिन्हावर उभे राहतील असे स्पष्ट झाले आहे.

राजकारण कुणीच कुणाचे कायमचा शत्रू नसतो

हर्षवर्धन पाटील यांना तुम्ही आतापर्यंत नेहमीच पवारांवर टीका केली आणि आज तुम्हीच त्यांच्या पक्षात जात आहात? असा थेट प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर पाटील यांनी राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसतात असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसते. आमचे पवारांशी खूप जुने व चांगले संबंध आहेत. आज मी निर्णय घेतला म्हणून माझे इतर पक्षांच्या नेत्यांसोबतचे संबंध बिघडणार नाहीत. राजकारण व समाजकारणात संबंध टिकवावे लागतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ती संस्कृती टिकवण्याची आपली जबाबदारी आहे.

राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…

आघाडीत समावेशासाठी MIMचा प्रस्ताव:किती जागा देणार तेवढे सांगा, जलील यांचे आवाहन; तर नवीन पक्षाला जागा देणे कठीण, संजय राऊतांकडून स्पष्ट

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या वतीने महाआघाडीमध्ये समावेश होण्याची भूमिका घेण्यात आली आहे. यासंदर्भातला प्रस्ताव महाविकास आघाडीकडे पाठवण्यात आला आहे. महाविकास आघाडी मध्ये आम्हाला किती जागा देणार, हे तुम्ही स्पष्ट करा, असे आवाहन एमआयएमचे राज्यातील प्रमुख नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवीन पक्षाला महाआघाडीमध्ये जागा देणे कठीण असल्याचे म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…

वाराणसीत मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवली:राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय षडयंत्राचा आरोप तर थोरात-बावनकुळेंनीही व्यक्त केली नाराजी

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या आधीही साईबाबांच्या जन्म आणि धर्मावरून वाद निर्माण झाले होते. वाराणसीच्या मंदिरांतून साई मूर्ती हटवण्यावरून राजकारणही तीव्र होताना दिसत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जे काही होत आहे ते योग्य नसल्याचे या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…

भाजपला श्रेय घेण्याची सवय:मराठी भाषेबरोबरच राज्याची प्रतिष्ठाही वाढली पाहिजे, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली अपेक्षा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मोठा सन्मान आहे. बंगाली, मराठी, पाली, प्राकृत आणि आसामी या पाच भाषांना हा सन्मान देण्यात आला आहे. मराठी भाषेला हा सन्मान मिळावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. पूर्ण बातमी वाचा…

राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती 6 ऑक्टोबरपासून:जिल्हानिहाय मुलाखतीचे नियोजन

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राहुल यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. काँग्रेसकडे 1688 उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यामुळे 8 ऑक्टोबर पर्यंत इच्छुकांच्या जिल्हानिहाय मुलाखती घेण्याचे नियोजन वरिष्ठ नेत्यांनी केले होते. परंतु, राहुल गांधी 4, 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मुलाखती 6 ऑक्टोबर पर्यंत लांबल्या आहेत. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24