महायुतीतील जागावाटपांवर दसऱ्याआधीच तोडगा: आम्ही तुल्यबळ असल्याने योग्य वाटा द्यावा; कुणीही कठोर भूमिका न घेण्याचे भरत गोगावलेंचे आवाहन



विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपांसंदर्भात चर्चा सुरू आहेत. महायुतीतील सर्वच पक्ष जास्तीत जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाचे आमदार यांनी विधानसभेसाठी काही जागांची मा

.

भरत गोगावले म्हणाले की, तिन्ही पक्षांकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र हा तिढा सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही तिन्ही पक्ष तुल्यबळ आहेत. त्यामुळे आम्हाला योग्य वाटा मिळावा यासाठी वरिष्ठांशी योग्य ती चर्चा करणार आहोत. तिन्ही पक्षांना समसमान हिस्सा मिळण्याकडे आमचे लक्ष असणार आहे. आम्ही दसऱ्याआधीच यावर काहीतरी तोडगा काढू. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी कुणीही कठोर भूमिका घे‌ऊ नये, असे आवाहनही भरत गोगावले यांनी केले आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील सर्वच सात जागा आम्ही महायुतीतून लढवणार आहोत, असेही ते म्हणाले.

नीतेश राणेंना दिला सल्ला

भरत गोगावले यांनी नीतेश राणे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यांवर देखील भाष्य केले आहेत. नीतेश राणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त वक्तव्य तसेच टीका टाळावी असा सल्ला गोगावले यांनी नीतेश राणे यांना दिला आहे. आम्ही जसे हिंद बांधवांना तीर्थयात्रेसाठी घेऊन जात असतो, त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांना देखील त्यांच्या धार्मिकस्थळी नेण्याचा आमचा प्रयत्न असतो, असेही गोगावले म्हणाले.

…तर मुख्यमंत्री विचार करतील

गुहागर येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मेव्हुण्याला तिकीट देण्याच्या चर्चांवर रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या विषयी मला नीट माहिती नाही. इच्छा बोलून दाखवणे काही गुन्हा नाही. पण रामदास कदम पक्षाच्या हिताच्या गोष्टी सांगत असतील, तर मुख्यमंत्री त्यावर विचार करतील. याबाबत पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली.

जनतेने विरोधकांना नाकारले

भरत गोगावले यांनी नुकतीच शिवनेरी बसमध्ये विमानातील हवाई सुंदरीच्या धर्तीवर शिवनेरी सुंदरी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधकांनी केलेल्या टीकेवर गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही दिशाहीन असतो तर सव्वा दोन वर्षे राज्याचा कारभार केला नसता. जनतेने आमचा स्वीकार केला आहे, पण विरोधकांना स्वीकारले नाही, असा घणाघात गोगावले यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24