मुंबई गणेश विसर्जन : ठाणे, नवी मुंबईसह मुंबईत अवजड वाहनांना बंदी

मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबई (mumbai), ठाणे आणि नवी मुंबई शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शहरात केवळ अत्यावश्यक सेवेच्या वाहनांनाच प्रवेश दिला जाईल.

ईद-ए-मिलाद सोमवारी असल्याने त्या दिवशी शहरात अनेक ठिकाणी मिरवणुका निघतात. शिवाय मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन होत असल्याने बुधवारी सकाळपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. दोन्ही सण एकत्र आल्याने मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरात दरवर्षी अवजड वाहनांना (heavy vehicles) बंदी घालण्यात येते. त्यानुसार यंदाही सोमवारच्या मध्यरात्रीपासून ते गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत अवजड वाहनांना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी असल्याची अधिसूचना लागू करण्यात आली आहे.

त्यानुसार अत्यावश्यक सेवेची वाहने बंदीतून वगळण्यात आली आहेत. पुण्याकडून मुंबईकडे येणारी सर्व अवजड वाहने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना मुंबई पुणे (pune) महामार्ग या दोन्ही मार्गांवर थांबवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी आपला वेळ व मालाचे नुकसान टाळण्यासाठी या दोन्ही मार्गावरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस महासंचालक, (वाहतूक) महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.


हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24