पश्चिम रेल्वेवरील गर्दी होणार कमी! रेल्वेचा मोठा निर्णय

पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

पश्चिम रेल्वे 1 ऑक्टोबरपासून सध्या प्रत्येकी 12 कोच असलेल्या दहा गाड्यांचे 15 डब्यांमध्ये रूपांतर करेल. यामुळे लोकलच्या फेऱ्याही वाढतील. प्रवाशांची गर्दी कमी करणे आणि अधिक प्रवासी आरामात आणि वेळेवर प्रवास करू शकतील याची खात्री करणे हे यामागचे विस्ताराचे उद्दिष्ट आहे.

काळ, संध्याकाळी ऑफिसला येण्या-जाण्याच्या वेळात होणारी खूप गर्दी यामुळे काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. याअंतर्गत 12 डब्यांच्या 10 गाड्यांचे रुपांतर 15 डब्यात करण्यात येत आहे. यासोबत रोजच्या फेऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला 15 डब्यांच्या 199 फेऱ्या धावत आहेत. असे असले तरी वाढती प्रवासी संख्या पाहता हे कोचही अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून यात वाढ होतेय. आता 12 डब्यांच्या 10 लोकल 15 डब्यांच्या केल्या जाणार आहेत. 

12 अतिरिक्त फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळे आता 15 डब्यांच्या 199 ऐवजी आता एकूण 209 इतक्या फेऱ्या होतील. प्लॅटफॉर्मवरील गर्दी थोडी कमी होऊन प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची गरज नसेल.

पश्चिम रेल्वेच्या या 15 डब्यांच्या लोकल अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेला धावणार आहेत. या वाढलेल्या फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या 1 हजार 394 वरून आता 1 हजार 406 इतकी होणार आहे.

याव्यतिरिक्त, चर्चगेट-विरार मार्गावरील 15 डब्यांच्या लोकल गाड्यांना चालना मिळेल. विरार ते चर्चगेट दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्याचा यामागचा उद्देश आहे.


हेही वाचा

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट होणार


नवी मुंबई : आनंदाची बातमी! सिडकोकडून मेट्रोच्या दरात घट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24