मुंबईत पुन्हा बेस्ट बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

लालबागनंतर आता गोरेगावमध्ये बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पूर्वकडील आरे कॉलनी परिसरात वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसच्या धडकेत 47 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

भीषण अपघातात 47 वर्षीय सादिक साजिद खान असं अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सादिक साजिद खान यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मंगळवारी दुपारी युनिट क्रमांक पाचमधून रॉयल पामच्या दिशेने जाणाऱ्या युनि क्रमांक या भागात ही भीषण अपघाताची घटना घडली. बेस्ट बस चालक रमेश लोंढे हे बस घेऊन जात असताना समोरून आलेल्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला बसचे कंडक्टर आणि नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी या व्यक्तीला मृत घोषित केले. आरे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांनी बस चालक रमेश लोंढे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील लालबाग या ठिकाणी बेस्ट बसचा अपघात झाला. या अपघातातील आरोपी दत्ता शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. बलार्ड पिअर या ठिकाणाहून सायनच्या दिशेने बस निघाली होती. लालबागमध्ये दत्ता शिंदे आणि बेस्ट बस चालकामध्ये हुज्जत झाली.

भांडणादरम्यान दत्ता शिंदेने बेस्ट बस चालकाचं स्टेअरिंग खेचलं. त्यानंतर बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 8 जण जखमी झाले. तर नुपूर मणियार मुलीचा मृत्यू झाला. तर आरोपी दत्ता शिंदेच्या मुसळ्या आवळल्या आहेत.


हेही वाचा

ठाणे : घोडबंदर रोडवर एसटी बस मेट्रोच्या खांबाला धडकली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24